*राज्य सबज्युनियर व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलात लातूर तर मुलीत पुणे विभाग अजिंक्य*




मानवत (. )महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन व परभणी जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असो. व मानवत स्पोर्ट्स अकॅडमी वतीने आयोजित 45वी सब ज्युनिअर राज्य हॉलीबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी क्रीडा स्पर्धाचा अंतिम सामना दि. 12 डिसेंबर २०२३ रोजी नेताजी सुभाष विद्यालय मानवत येथे संपन्न झाले यात अंतिम सामना मुलींच्या गटात पुणे वि. लातूर मध्ये चुरशीच्या लढतीत पाच सेट मध्ये पुणे विभागाने 3-2 सेट मध्ये जिंकून विजेते पद पटकावले मुलींचे विजेते संघ प्रथम क्रमांक - पुणे विभाग, द्वितीय क्रमांक - लातूर विभाग, तृतीय क्रमांक - नागपूर विभागाने पटकावले .

       तर मुलांच्या गटात अंतिम सामना लातूर वि. नागपूर दरम्यान चुरशीच्या लढतीत पाच सेट मध्ये 3-1 ने लातूर संघ अजिंक्य ठरला .

मुलांचे विजेते संघ प्रथम क्रमांक - लातूर विभाग, द्वितीय क्रमांक - नागपूर विभाग, तृतीय क्रमांक - पुणे विभाग.

प्रेक्षकांना प्रेक्षक गॅलरीत बसून सामन्याचा आनंद घेतला. 

          बक्षीस वितरण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सतिश पाठक ( राज्य उपाध्यक्ष व्हॉलीबॉल ) प्रमुख पाहुणे मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दंतुलवार साहेब,

संजय नाईक ( राज्य महासचिव व्हॉलीबॉल) काझी अर्शद (विभागीय सचिव) बाबु आचरेकर, दत्ताभाऊ सोमवंशी, राजेभाऊ कामखेडे, श्याम भाऊ चव्हाण, चंद्रशेखर नावाडे (माजी मुख्याध्यापक) गणेश माळवे (राज्य सचिव टेनिस व्हॉलीबॉल)डी.डी. सोन्नेकर (राष्ट्रीय योग प्रशिक्षक)बाबाजी अवचार, गोपाळ मंत्री, विक्रम सिंग दहे, गोपाळ लाड व मानवत स्पोर्ट्स अकॅडमी चे अध्यक्ष किशन भिसे आदी मान्यवरांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफी देण्यात आली.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नांदगावकर सर यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी मानले

स्पर्धा यशस्वीतेसाठी पंचप्रमुख बाबु आचरेकर , गुरूप्रित सिंग अवदेश पाठक, रणजित राठोड, शाहेबाज खान व मानवत स्पोर्ट्स ॲकडमी पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या