नायगाव/नागेश कल्याण
51 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील बहुसंख्य शाळा, विद्यालयातील विद्यार्थ्यनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवून आपल्या शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांच्या मदतीने आपल्या शाळचे प्रतिनिधित्व करित खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.
शहरातील ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल येथे 14 डिसेंबर रोजी तालुकास्तरीय 51 व्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा विषय समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान असा होता. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गट शिक्षणाधिकारी नंदकुमार काकडे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी मुख्य अतिथी म्हणून मुख्याध्यापक आनंद रेणगुंटावार, केंद्रप्रमुख शिवराज साधू, चिकलवार , नलबलवार, उद्धव ढगे, माधव रेडेवाड, कपिल गारटे, आदींची उपस्थिती होती. सदर विज्ञान प्रदर्शनात उच्च माध्यमिक गटातून 32 वैज्ञानिक माॅडेल माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून 20 प्रयोग सहभागी झाले होते. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू प्रदर्शनात एकूण 18 साहित्य सहभागी झाले. प्राथमिक गटातून एकूण 34 शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता. यात प्रथम द्वितीय, तृतीय असे क्रमांक काढण्यात आले. परिक्षक म्हणून भोसले सर, मुदखेडे सर, नितीन सुजलेगावकर, चिखले सर, ए.ए.शेख सर यांनी काम पाहिले. समारोप प्रसंगी बक्षिस पात्र विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी नंदकुमार काकडे, मुख्याध्यापक सरोजा मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले
51 व्या विज्ञान प्रदर्शनाचे एकंदरित निकाल असे..
▪️:प्राथमिक गट:
प्रथम क्रमांक- (व्हर्सटाईल किचन) सान्वी संतोष कल्याण ( गुरुकुल पब्लिक स्कूल नायगाव)
द्वितीय क्रमांक- ( सेफ्टी ब्रीज फाॅर रेल्वेस्टेशन) शेख साकिब ( ओआसिस इंग्लिश मीडियम स्कूल कुंटूर)
तृतीय क्रमांक- ( अंकाची गम्मत) प्रतीक्षा पोटफोडे ( सद्गुरू नराशाम विद्यालय रातोळी येथील विद्यार्थ्यानी मारली बाजी.
:▪️माध्यमिक गट:
प्रथम क्रमांक- (मल्टिपर्पज फर्टिलायझर मशीन) विशाल कदम
द्वितीय क्रमांक- (ऊर्जा अक्षयतेचा नियम) वैष्णवी काळे (जनता ज्यु.कालेजात नायगाव)
तृतीय क्रमांक- (पिक्चर इरिगेशन सिस्टीम) सृष्टी कदम (ग्रीन व्हॅली स्कूल खैरगाव) याने पटकावला.
addComments
टिप्पणी पोस्ट करा