मुंबई दि.१५:परेल येथील सोशल लीगच्या पुनर्बांधणीचे काम थांबून येथील पूर्वपारचे वैभव संपुष्टात येता कामा नये.अधिवेशन संपताच शासनाने त्वरित तोडगा काढावा आणि वेळेतच ते काम पूर्ण व्हावे,अशी जोरदार मागणी शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी येथे विधान परिषदेत केली आहे.
विधान परिषदेत नुकतेच आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर बोलताना सचिन अहिर यांनी अशी खंत व्यक्त केली आहे, मराठी रंगभूमीची परंपरा जपणारी ही वास्तू आहे.परंतु ही वास्तुच उभी रहाणार नाही,असा गैरसमज निर्माण करण्यात येत आहे.पण मग या संकुलातील
शाळेत आज जवळपास ४५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्यांना कुठे जायचे?हेच ठाऊक नाही आहे! राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा अध्यक्ष या नात्याने मला ज्ञात आहे की,पूर्वी येथे नाटकेच नव्हे तर मश्चिंद्र कांबळी,विजय पाटकर आदीं अभिनेत्यांच्या तालमी होत!येथे आयुष्यभर सेवा करणाऱ्या सेवकांनाही घड्याळ्या सारखी मामुली वस्तू आणि तुटपुंजी रक्कम भेट देऊन,टाटा.. बाय बाय..!करण्यात आले आहे! तेव्हा त्यांना पूर्ववत रोजगार द्यावा,पुन्हा दामोदर नाट्यगृह सुरू व्हावे आणि तालमी साठीची जागा पुन्हा नव्या वास्तूत उपलब्ध करून द्यावी,या मागण्या आमदार सचिन अहिर यांनी लावून धरल्या आहेत.
••••••
addComments
टिप्पणी पोस्ट करा