डॉ. सुरेश सावंत यांची बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने पैठण येथे पहिले मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. म. सा. प. चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली…
