आंबेकर आंतर गिरणी क्रिकेट स्पर्धेत विजयी टाटा मिल तर उपविजयी इ.यु.मि.क्र ५!*




    मुंबई दि.९ : राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या गं.द.आंबेकर स्मृती आंतर गिरणी क्रिकेट स्पर्धेत टाटा मिल अंतिम विजयी तर उपविजयी इ.यु.क्र.५ ठरली.सहा शतकाच्या स्पर्धेत टाटा(३६) विरूध्द इं.यु.मि.५(२१) अशा एकतर्फी खेळात टाटा मिलने १६ गुणाने विजय मिळवला.परेलच्या नरेपार्क मैदानावर या स्पर्धा पार पडल्या.राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांच्या ५९ व्या स्मृती प्रित्यर्थ काल पासून स्मृती सप्ताह आयोजित करण्यात आला.

    या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गोलंदाजी आनंद मोरे(टाटा मिल), सर्वोत्कृष्ट व्हिकेटकिपर रफिफ पाले (टाटा),उत्कृष्ट फलंदाज अनिकेत चव्हाण (इ.यु.मि.५) यांची निवड झाली. 

   स्पर्धेत टाटा,इंयुमि क्र.५,आरएमएमएस आणि पोदार हे क्रिकेट संघ खेळले.संघटनेचे उपाध्यक्ष सुनिल बोरकर यांनी क्रीडा प्रमूख म्हणून काम पाहिले.खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर बजरंग चव्हाण, सेक्रेटरी शिवाजी काळे आणि सर्व संघटन सेक्रेटरी यांचे या स्पर्धेत सहकार्य लाभले.

    इंटर कॉलेज क्रिकेट स्पर्धेत आंबेकर प्रतिष्ठान कॅटरिंग कॉलेजच्या थर्ड इयर विद्यार्थी संघाने बाजी मारली.कॉलेजचे प्राचार्य केतन सारंग,संचालक विलास डांगे यांचे विशेष सहकार्य लाभले.बक्षिस वितरण समारंभ गं.द.आंबेकर‌ यांच्या १३ डिसेंबर रोजी महात्मा गांधी सभागृहात पार पडण-या स्मृती दिनी होईल.***

टिप्पण्या