नांदेड : देशांतर्गत साखरेची टंचाई निर्माण होईल या भीतीने केंद्र सरकारने उसाचा रस,सिरप व साखरेपासून इथेनॉल निर्मिती बंद करण्याचा तुघलकी निर्णय घेतला त्यामुळे शेतकऱ्यांचे वा कारखाण्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय मागे घ्यावा व शेतकऱ्यांना ज्यादा दर देऊन जास्तीचा ऊस लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करावे अशी मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊसदार नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
यंदा राज्यासह देशभरात साखरेचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता असल्याने उसाला समाधानकारक दर मिळेल अशी आशा होती परंतु केंद्राच्या शेतकरी विरोधी भूमिका घेऊन उसाचा रस सिरप व साखरेपासून इथेनॉल निर्मिती करण्यावर बंदी करण्याचा निर्णय घेतला. यंदाचे ऊस उत्पादन लक्षात घेता भविष्यात साखरेची टंचाई निर्माण होईल व महागाई वाढेल या ग्राहक हितापोटी केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा समाधानकारक भाव हिसकावून घेतला यामुळे देशभरातील उत्पादन उत्पादक शेतकऱ्यात प्रचंड नाराजी पसरली आहे. देशांतर्गत साखरेचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी हिताविरोधाचे निर्णय घेण्यापेक्षा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना चांगला दर देऊन ऊस लागवड वाढवण्या करिता प्रोत्साहित करावे. अशी मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊसदार नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी सहकार व गृहमंत्री अमित शहा यांचेकडे केली आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा