नांदेड - शहराच्या सर्वांगिण विकासाच्या संकल्पनेत उपलब्ध असलेल्या रिकाम्या जागेवर छोटी-छोटी क्रिडांगणे, खेळाची मैदाने विकसित केली तर यातून युवा खेळाडूना, क्रिडा कौशल्याला त्यांच्यातील क्रिडा गुणांना वाव मिळेल. या दृष्टिकोनातून नांदेड शहरातील स्नेह नगर भागातील अडगळ ठरलेली जागा आज एका सुंदर टेनिस कोर्टमध्ये रुपांतरित झाली आहे. स्नेह नगर येथील शासकीय वसाहतीमध्ये अडगळीत पडलेल्या जागेवर साकारलेल्या टेनिस कोर्टचे ऑनलाईन उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, विधान परिषदेचे सदस्य अमर राजूकर, महापौर मोहिनी येवणकर, माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS