धर्माबाद (अहमद लड्डा)
मंगळवारी शहरातील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वतीने पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टी सिंग जहागीरदार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. ज्यामध्ये धर्माबाद तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाली. प्रास्ताविक दत्तात्रय कवडे यांनी केले. ते म्हणाले की, आगामी काळात मनसे जिल्हा परिषद, नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असून धर्माबाद तालुक्यातील सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. शहराध्यक्ष सचिन रेड्डी चाकरोड यांच्या नेतृत्वात मनसे नगर परिषदेच्या सर्व जागेसाठी निवडणूक लढवणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष मॉन्टी सिंग जहागीरदार यांनी मनसे पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पुष्पहार देऊन स्वागत केले. जिल्हाध्यक्ष मॉन्टी सिंग जहागीरदार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पक्षात काम करताना अडचणी येत असतात.कार्यकर्त्यानी कायद्याच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे. मनसे अनुभवी लोकांचा पक्ष आहे.काही ही अडचण आल्यास फोन करणे. महाराष्ट्रात कोणासही कोणत्याही ठिकाणी रक्ताची गरज भासल्यास त्याबाबत त्वरित व्यवस्था केली जाईल. त्यांच्यासमवेत मनसेच्या जिल्हा पदाधिकारी महिला व पुरुष यांचे येथे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष साखरे यांनी केले. आभार पत्रकार शिवराज गाडीवान यांनी केले.यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सचिन रेड्डी चाकरोड, शहर उपाध्यक्ष गजानन मुडेवार, तालुका अध्यक्ष नागनाथ माळगे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष लोकडोबा कावडे, वाहतुक सेना अध्यक्ष सुगत पहेलवान, विद्यार्थी सेना शहर उपाध्यक्ष आकाश लोसरवार, माजी तालुका अध्यक्ष दत्तात्रय कावडे व तालुका सचिव माधव माळगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. हा कार्यक्रम धर्माबाद तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमात स्व प्रकाश कौडगे यानां दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.

COMMENTS