नायगांव/ प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय वायरलेस विभाग नांदेड येथे कार्यरत असलेले पोलीस जमादार विठ्ठलराव पिराजी भालेराव यांचे रात्रपाळीत ड्यूटीवर असताना ह्दयविकाराचा तीव्र झटका येऊन ते जागीच गतप्राण झाले. त्यांचे शासकीय रुग्णालय विष्णूपूरी नांदेड येथे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांच्या मुळ गावी नायगांव बाजार येथील त्यांच्या मालकीच्या शेतामध्ये पोलीसांची हवेमध्ये गोळीबार करून मानवंदना दिल्यानंतर दि 8 जून 2021 रोजी संध्या 4.00 वा अंत्यविधी पार पडला. विठ्ठलराव भालेराव यांची सेवा अजून दोन वर्ष शिल्लक असतानाच काळाने अचानक त्यांच्यावर घाव घातला. ते पोलीस खात्यामध्ये असूनही सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते, अनेकांच्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये हिरीरीने भाग घेत असत. ते एक उत्कृष्ठ हिन्दी व मराठी गीताचे गायक होते वामनदादा कर्डक यांच्या गाण्याचे ते फार चाहते होते त्यामुळे कोणत्याही ठिकाणी सहज गप्पागोष्टीमध्ये उपस्थितांना गायन करून मंत्रमुग्ध करीत असत. त्यांनी सर्वच जाती व धर्मातील व्यक्तीसोबत संबंध जोडून मित्रत्व निर्माण केले होते त्यामुळे त्यांच्या जाण्याने परिसरामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे त्यांच्यापश्चात पत्नी,एक विवाहीत मुलगी, जावई, एक अल्पवयीन मुलगा असा परिवार आहे. यावेळी नायगांव पो स्टे चे पोलीस निरीक्षक पडवळ साहेब, प्रा.डॉ. शंकर गड्डमवार, सतिष कावडे, डॉ.आर. जे.बसवंते यांनी विठ्ठल भालेराव यांच्या बदल जुन्या आठवणींना उजाळा देऊन भावना व्यक्त करून श्रध्दांजली अर्पण केले त्यानंतर सामुहिक श्रध्दांजली अर्पण करून मुलाच्या हस्ते भडाग्नी देण्यात आली. अंत्यसंस्कार कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. रविंद्र भालेराव यांनी केले.अंत्यविधीस गावातील प्रतिष्ठित नागरिक बाहेरगावाहून आलेले मिञ मंङळ पाहुणे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

COMMENTS