राम दातीर
माहूर ( प्रतिनिधी )कोरोना महामारीची धास्ती दूर करण्यासाठी अतिशय गुणकारी असलेली व नवसंजवनी देणारी कोविड प्रतिबंधक लस प्रत्येकाने घेणे नितांत गरजेचे असल्याचे मत सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी व्यक्त केले .दि.5 जून रोजी स्थानिक ग्रामीण रूग्णालयात दिव्यांग संघटनेच्या प्रतिनिधीशी चर्चा करतांना ते बोलत होते.
माहूर शहरासह तालूक्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेचा सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तिकीरण पूजार यांनी आढावा घेवून समाधान व्यक्त केले. त्यांनी ऑक्सिजन जनरेशन प्लांट व सेंट्रल ऑक्सिजन लाइनच्या कामाची तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली.याचवेळी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे तालूक्यातील सरपंचासोबत संवाद साधून लसिकरण मोहिमे बाबत जनजागृती केली.
यावेळी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्यंकटेश भोसले, तालूका आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव भिसे,डॉ.अभिजीत अंबेकर यांचेसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS