मरळकच्या मुख्य रस्त्याचे काम करून देणार - आ. बालाजी कल्याणकर

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर व तहसीलदार किरण आंबेकर यांच्याकडून रस्त्याची पाहणी  ---------------------------------------------------------- ...


जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर व तहसीलदार किरण आंबेकर यांच्याकडून रस्त्याची पाहणी 

----------------------------------------------------------

नांदेड - शहरापासून जवळच असलेल्या मरळक येथील विमलेश्वर महादेव मंदिर येथे श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते.  मात्र मरळक गावाला जाणार्‍या मुख्य रस्ताच अरुंद व खड्डेमय असल्यामुळे भाविकांची गैरसोय होत होती. अखेर आ. बालाजी कल्याणकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर व तहसीलदार किरण आंबेकर यांच्यासमक्ष रस्त्याची पाहणी केली आहे. लवकरात - लवकर मरळक गावाला जोडणारा रस्ता करून देणार असल्याचे आ. बालाजी कल्याणकर यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले आहे.

जागृत देवस्थान म्हणून मरळक येथील विमलेश्वर महादेव मंदिराची ओळख आहे. हे मंदिर प्राचीन काळातील हेमाडपंती असल्यामुळे वेगळे महत्व देखील आहे. येथे जिल्ह्यातूनच नव्हे तर इतरजिल्ह्यातून  देखील भाविक मोठ्या श्रद्धेपोटी येत असतात. तसेच शहरातील नागरिक देखील श्रद्धेपोटी तसेच पर्यटनक्षेत्र असल्यामुळे  मरळक येथे जातात.  मरळक गावाला जाण्यासाठी मुख्य रस्ताच व्यवस्थित नसल्यामुळे अनेक अडचणी भाविक तसेच गावातील नागरिकांना येत होत्या. अखेर नांदेड उत्तरचे आ.  बालाजी कल्याणकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर व तहसीलदार किरण आंबेकर यांना घेऊन रस्त्याची पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील माझ्याकडून आपल्या गावाला विकासाबाबत मदत होईल तितकी मी करण्यास तयार आहे. तसेच नांदेड उत्तरचे आ. कल्याणकर यांनी देखील आपल्या गावाचा विकास हे माझे उद्दिष्ट असून, हा रस्ता झाल्यामुळे अनेकांच्या अडचनी  दूर होणार आहेत. आगामी काळात आपली कोणतीही समस्या असुद्या ती मी सोडविणार असून लवकरात लवकर हा रस्ता मी माझ्या निधीतून करून देणार असल्याचे आ. बालाजी कल्याणकर यांनी संगितले आहे.                                             

                यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन  इटनकर, तहसीलदार किरण आंबेकर हे उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख जयवंत कदम, मरळक गावातील सरपंच पोहरे, उपसरपंच बालाजी कदम, ज्येष्ठ शिवसैनिक बालाजी कदम, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश शिंदे, यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel