मराठवाडा साहित्यपरिषद ,शाखा परभणी द्वारा आयोजित *'अक्षर भेट'* या उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध लेखक * *प्रसाद कुमठेकर** हे फेसबुक पेजवर *' मला काय दिसतं''* या विषयावर बोलणार आहेत. *प्रसाद कुमठेकर, उदगीर.*

 मराठवाडा साहित्यपरिषद ,शाखा परभणी द्वारा आयोजित

 *'अक्षर भेट'* 

  या   ◆ 'बगळा' आणि 'बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या' या दोन कादंबऱ्यांच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटवणारे लेखक म्हणून प्रसाद कुमठेकर सर्वपरिचित आहेत. आजच्या तरुणाईच्या मनातील अस्वस्थता बेमालूमपणे चित्रित करण्याचे काम अत्यंत संवेदनशीलतेने कुमठेकर यांनी केले आहे. स्वतःची भाषा सापडलेला महत्त्वपूर्ण कादंबरीकार म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल.

   ◆भोवतालाकडे पाहण्याची तिरकस शैली, मानवी व्यवहाराकडे पाहण्याची स्वतःची दृष्टी आणि उदगीर परिसरातील बोलीभाषा यांचे एकजीव रसायन म्हणजे त्यांचे लेखन.

   ◆ मागील सतरा वर्षांपासून टीव्ही, रेडिओ, जाहिरात, चित्रपट क्षेत्रात कार्यरत.

Times of India Group(Radio Mirchi),Viacom 18(MTV- Nickelodeon), Sony Pictures Networks India, TV Today  इत्यादीसारख्या नामांकित कंपन्यांमधून दिग्दर्शक, निर्माता, लेखक म्हणून काम. त्यांनी या क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल म्हणून इलेक्ट्रॉनिक माध्यमात सर्वोच्च मानाचे समजले जाणारे आंतरराष्ट्रीय पुरस्कार

 •“World Promax” gold Category 

• Asia Pacific Promax gold Category.

• India Promax gold Category त्यांना प्राप्त झाले आहेत.

 ◆'बगळा' या कादंबरीस आपटे वाचन मंदिर ‘वि. मा. 

शेळके (गुरुजी) उत्कृष्ट कादंबरी’ 

पुरस्कार (२०१६),कविवर्य 

नारायण सुर्वे राज्यस्तरीय 

साहित्य उत्कृष्ट 

कादंबरी पुरस्कार

(२०१६) प्राप्त.

“बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या”

 कादंबरीस मसापचा नरहर कुरुंदकर वाङ्मय आणि बाराशिव पुरस्कार प्राप्त.

◆'अतीत कोण? मीच...' आणि

'पंचकल्याणी' लवकरच प्रकाशित.

*मराठवाडा साहित्य परिषद, शाखा परभणी या फेसबुक पेज वर* या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. 


 *रविवार दि.27 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 7:00वा.* साहित्य रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती.


आपले विनीत 

मराठवाडा साहित्य परिषद, शाखा परभणी

 *या लिंक वर क्लिक करा...*

https://www.facebook.com/vhargule/

टिप्पण्या