उदगीर शहरात कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढणार नाही*  *याची दक्षता घ्या, संबंधित यंत्रणांना पालकमंत्री देशमुख

लातूर, ...     *लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील स्थिती नियंत्रणात आली असली तरी यापुढे कोविड १९ विषाणूंचा प्रादुर्भाव वाढणार नाही,* *यासाठी प...

लातूर, ...


    *लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील स्थिती नियंत्रणात आली असली तरी यापुढे कोविड १९ विषाणूंचा प्रादुर्भाव वाढणार नाही,* *यासाठी प्रशासन, नगरपरिषद, पोलीस आणि आरोग्य या सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक* *कार्य मंत्री तथा लातूर जिल्हाचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.*
    पालकमंत्री देशमुख यांनी मंगळवारी पुन्हा उदगीर शहरातील कोविड १९ चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणांच्या प्रमुखांची झूम अॅप माध्यमातून आढावा बैठक घेतली. या बैठकीत  अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ढगे, तहसीलदार, श्री. मुंडे, नपचे मुख्याधिकारी यांच्यासह उदगीरशी संबंधित वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. 
    
    या बैठकीच्या प्रारंभी पालकमंत्री देशमुख यांनी उदगीर शहरातील ताजी स्थिती जाणून घेतली, उदगीर शहरात एकूण २९ जणांना कोविड १९ ची लागण झाली असल्याचे उघड झाले आहे. या पैकी सध्या १७ रुग्ण उपचार घेत असून ११ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे  तर एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.  शहरातील कांही भाग कंटेन्मेंट झोन म्हणूनसिल करण्यात आले आहेत, या वेळी त्यांनी
सर्वत यंत्रणेचे अनुभव आणि त्यांच्या असलेल्या अडचणींची माहिती घेतली, त्या अडचणी सोडविण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रशासनाने यात लक्ष घालावे असे निर्देश दिले.
    उदगीर शहरात पोलिसावर वाढलेला ताण लक्षात घेतात त्यांच्या मदतीला होमगार्डची सेवा देण्यात आली असल्याचेही पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. शहरात संचारबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात असली तरी कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊनचे नियम काटेकोर पाळावेत, परप्रांतीय किंवा इतर जिल्ह्यातील नागरिक परवानगी शिवाय शहरात येऊ नये याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. रमजान ईद साठी घरपोच साहित्य पोहोचवता येईल का? याची तपासणी नगरपालिकेने करावी. यातून जनतेची ही अडचण दूर होईल, बाजारपेठेत गर्दी होणार नाही असेही देशमुख यांनी म्हटले आहे.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group