रुसलेल्या चेहऱ्याला हसवणारा कवितासंग्रह - 'नदी रुसली, नदी हसली' कु. वैष्णवी सिद्धार्थ मस्के
आज मी तुम्हाला अतिशय छान छान कविता असलेल्या, आपल्या मनातील गोष्टी सांगणाऱ्या एका कवितासंग्रहाविषयी सांगणार आहे. त्या कवितासंग्रहाचे नाव आहे 'नदी रुसली, नदी हसली'. या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ इतके आकर्षक व रंगीबेरंगी आहे की कोणीही हे पुस्तक वाचण्यास उत्सुक होईल. मुखपृष्ठावर खूप सारे वेगवेगळ…
