महाआरोग्य शिबीर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दंतरोग शस्त्रक्रिया, मोफत औषधी वाटप आणि तपासणी होणार मोफत

 

सरपंच डॉ.दत्ता मोरे यांचा वाढदिवस 5 सप्टेंबर रोजी सामाजिक उपक्रमाने होणार साजरा 

नांदेड प्रतिनिधी 

       आजच्या या युगात सामाजिक भान जपत समाजसेवा करणं हे दुर्मिळ झालं आहे प्रत्येक जण आपले हित जोपसण्यात मशगुल झाला आहे. मात्र याला अपवाद बरीच सामाजिक कार्य करणारी मंडळी आहेत,त्यातीलच एक समाजसेवक डॉ. दत्ता मोरे. पेशाने डॉक्टर असलेले अन राजकीय उंचीवर पोहचत देगांवचे प्रथम नागरिक म्हणून सरपंच या पदावर विराजमान झालेलें असे हे व्यक्तिमत्व.

      लहानपणा पासून समाज सेवकाचे बाळकडू त्यांना त्यांचे मोठे बाबा बळवंतराव मोरे यांच्याकडून मिळाले. ते शेतकरी व शेतमजूर चळवळीचे राज्यअध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या चळवळीच्या माध्यमातून अनेक गरिबांना न्याय मिळून दिला त्याचाच वारसा डॉ. दत्ता मोरे यांनी जपत अनेक वेळा सामाजिक उपक्रम राबवत सिद्ध करत असतात.

     कोरोना काळात आपल्या गावातील नागरिकांना सोयी सुविधा मिळून देत त्यांनी सॅनिटायझर, मास्क,औषधी अशा सोयी सुविधा पुरवत नागरिकांचा कोरोना पासून बचाव केला. सामाजिक बांधिलकी जोपासत जवळपास ३०० मोफत दंत आरोग्य शिबिरे डॉ.मोरे यांनी घेतली आहेत. त्यांनी सामाजिक सेवेसोबतच राजकीय झेप घेत भारत राष्ट्र समिती पक्षात महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर त्यांनी आपल्या सहकार्यासोबत मराठा आरक्षण लढा आणि "आम्ही जरांगे- गरजवंत मराठ्यांचा लढा " चित्रपट निर्मिती साठी स्वतःची शेती गहाण ठेवून मराठा आरक्षणाचा मागील ४५ वर्षा पासूनचा इतिहास व सामाजिक लढा दाखवण्यासाठी दिग्गज अभिनेते घेऊन चित्रपट बनवला व मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष, त्याग, इमानदारी व समाजावरील निष्ठा या चित्रपटाच्या माध्यमातून देशाला दाखवली. आज ही डॉ. मोरे हे जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनात त्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी झाले होते व आरक्षणाचा गुलाल उधळून च ते गावी परतले.

   डॉ. दत्ता मोरे यांनी आपल्या कारकिर्दीत नाम फौंडेशन व शासकीय यंत्रणेचे सहकार्य घेऊन देगांव नाल्याच्या रुंदीकरण व खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे गावातील पाण्याची पातळी वाढण्यास व देगाव जलसमृद्ध होण्यास मदत झाली. कृष्णूर एमआयडीसी मधील शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे हडपणाऱ्या मेगा ऍग्रो कंपनीला धारेवर धरत आंदोलन पुकारले व शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्याचा प्रयत्न केला.

      प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते श्री. सयाजी शिंदे यांच्या वृक्षलागवड व वृक्षसंगोपनाच्या 'सह्याद्री देवराई फॉउंडेशन ' मार्फत नांदेड जिल्ह्यात सुंदर अशी वनराई व देवराई करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नेतृत्त्व आणि कर्तृत्व कुणाकडून उसने मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण करावं लागते ते डॉ. दत्ता मोरे यांनी सिद्ध केलंय. 5 सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस असतो त्या निमित्तानी त्यांनी हार तुरे न स्वीकारता सामाजिक भान राखत मोतीबिंदू, दंतरोग शस्त्रक्रिया, मोफत औषधी वाटप आणि महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. देगाव ता. नायगाव या त्यांच्या मूळ गावी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी यां शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सुद्धा त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पण्या