सानपाड्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सामाजिक उपक्रम*


नवी मुंबई :  सानपाड्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळात बाप्पाच्या दर्शनासाठी येत असलेल्या सर्व गणेश भक्तांसाठी गणपती मंडपात न्यू मिलेनियम हॉस्पिटल, सानपाडा यांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले. यावेळी गणपती मंडळाच्या वतीने गणेश भक्तांसाठी राबविण्यात आलेल्या या आरोग्य तपासणी शिबिरात सहभागी होवून या शिबिराचा अनेक गणेश भक्तांनी लाभ घेतला. त्याचप्रमाणे महिलांसाठी हळदीकुंकू, विद्यार्थ्यांचा गुणगौरव, सुस्वर भजन असे अनेक विविध सामाजिक उपक्रम मंडळाच्या वतीने राबविण्यात आले. म म्हणजे महाराष्ट्र,  मराठी तसेच महाराष्ट्राची परंपरा जतन करणारी सजावट या मंडळांनी यंदा राबवली आहे. सानपाडयाचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये मराठी भाषा ,महाराष्ट्र वारकरी संप्रदाय यांच्या प्रती आपली सर्वांची एकात्मता दर्शवण्याकरिता सर्व पुरुष कार्यकर्ते,गणेशभक्त यांनी 

सफेद टोपी, सफेद कुर्ता, सफेद पायजमा, उपरणे परिधान करण्याचे आवाहन  सानपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष  शिवाजी सिताराम ढमाले, कार्याध्यक्ष विश्वास कोंडिबा बोऱ्हाडे, सचिव बाबाजी महादेव इंदोरे, 

खजिनदार स्वप्निल अरुण रोडे यांनी केले आहे.  यावर्षी अतिशय सुंदर आणि छान उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल सानपाड्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्वच गणेश भक्त  विशेष कौतुक करीत आहेत. 

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या