पनवेल: मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक एकनाथ मराठे ( शेड सुप्रिटेंडंट) ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुंबई पोर्टमधून स्वेच्छा निवृत्ती योजनेअंतर्गत सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचा बंधुत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समीर राणे व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धीप्रमुख मारुती विश्वासराव यांच्या हस्ते १ सप्टेंबर २०२५ रोजी पनवेल येथे सपत्नीक शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील सेवानिवृत्त सहाय्यक वाहतूक प्रबंधक प्रकाश दाते, सेवानिवृत्त कार्यकर्ते सुरेश मुरुडकर, श्रीनिवास गुप्ता, राजू सागवेकर, सुभाष खोत,अनिल गांवकर, राजू करकेरा आदी मान्यवर उपस्थित होते.
एकनाथ मराठे हे मुंबई पोर्टच्या गोदी विभागात टॅली क्लार्क म्हणून कामाला लागले. त्यांना सेवा कालावधीमध्ये शेड सुपीटेंडंटपर्यंत बढती मिळाली. संगणक क्षेत्रातील हुशार कर्मचारी म्हणून एकनाथ मराठे यांची मुंबई पोर्टचे तत्कालीन वाहतूक प्रबंधक रियाज शेख यांनी त्यांची मुंबई पोर्टच्या अध्यक्षांसाठी स्वीय सहाय्यक म्हणून शिफारस केली. एकनाथ मराठे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या कालावधीमध्ये अनेक कामगार कर्मचाऱ्यांना मदत केली. मिळालेल्या संधीमध्ये त्यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना मदत केली. त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा असून, ते एक चांगले लेखक आहेत. त्यांनी अनेक विषयावर लिहिलेले लेख वाचनीय असतात. ट्रेकिंग करणे हा त्यांचा छंद असून, ते अनेक वेळा आपल्या सहकाऱ्यांसमवेत ट्रेकिंगला जातात. बंधुत्व फाउंडेशन व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने एकनाथ मराठे यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा