सानपाड्यातील लोकप्रिय नगरसेवक सोमनाथ वास्कर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

नवी मुंबई: सानपाड्यातील लोकप्रिय व कार्यसम्राट नगरसेवक  सोमनाथ चिंतामण वासकर यांच्या वाढदिवसानिमित्त महारोजगार मेळावा,  रक्तदान शिबिर, चित्रकला स्पर्धा,  क्रिकेट स्पर्धा,  सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू वाटप इत्यादी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते.

सानपाड्यातील सर्वसामान्य नागरिकांना आपला  माणूस म्हणून लोकप्रिय असलेले माजी  नगरसेवक सोमनाथ वास्कर यांचा सानपाड्यातील विविध संस्थांच्या वतीने  ३ ऑगस्ट २०२५  रोजी ४६ वा वाढदिवस साजरा झाला. या  वाढदिवसानिमित्त  झालेल्या महारोजगार मेळाव्यात ४६ जणांना विविध कंपन्या मार्फत नोकरीसाठी नियुक्ती पत्र देण्यात आली. रक्तदान शिबिरात  ६५  रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर चित्रकला स्पर्धेत ३००  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पाटण तालुक्यातील धनगर समाजाने क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

सोमनाथ वास्कर हे गायत्री मंदिर, शिव मंदिर ट्रस्ट,  वात्सल्य ट्रस्ट, श्री.दत्त मंदिर विद्यालय, बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था अशा अनेक सामाजिक संस्थांशी संबंधित आहेत. सानपाडा येथील सर्वसामान्य नागरिक,  गोरगरीब  जनता, ज्येष्ठ नागरिक. साफसफाई कामगार, शाळा कॉलेजमधील ऍडमिशन, शैक्षणिक संस्थांना व मुलांना मदत , गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, छत्री वाटप,  शैक्षणिक साहित्य वाटप, लहान मुले दत्तक घेणे,  क्रिकेट स्पर्धा, हॉस्पिटलसाठी लागणारे सहकार्य, पंढरपूर दर्शन मोफत बस सेवा, सानपाडा वासियांसाठी गोवा पिकनिक, महाबळेश्वर पिकनिक, कोकणातील गणपती उत्सवासाठी मोफत बस सेवा, ज्येष्ठ नागरिकांना मदत   असे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविणारे, सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे आणि माणसं जोडणारे सोमनाथ वास्कर  यांना दत्त मंदिर ट्रस्ट, श्री दत्त मंदिर विद्यालय, वात्सल्य ट्रस्ट, सानपाडा शिवसेना शाखा, युवा सेना, गणेश मंडळ,  मराठा विकास प्रतिष्ठान, महिला बचत गट, सफाई कर्मचारी संघटना या सर्व संस्थांच्या वतीने वाढदिवसाच्या  शुभेच्छा देण्यात आल्या. सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघ, सिताराम मास्तर उद्यानातील गार्डन ग्रुप ७. ५०,  ७.०५, ६.३०  यांच्यावतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी समाजसेवक भाऊ भापकर, नवी मुंबई शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख  अजित सावंत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे  विभागप्रमुख अजय पवार,  पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे  कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, खजिनदार विष्णुदास मुखेकर, उपाध्यक्ष बळवंतराव पाटील, सेवानिवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, सानपाडा हास्य क्लबचे योगशिक्षक भरत खरात, गार्डन ग्रुपचे अध्यक्ष सदाशिव तावडे,  खजिनदार रणवीर पाटील, सामाजिक कार्यकर्ते गणपत वापरे इत्यादी मान्यवरांनी सोमनाथ वासकर यांच्या सामाजिक कार्याचा गुणगौरव करून त्यांना पुढील सामाजिक व राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

आपला 

 मारुती विश्वासराव

टिप्पण्या