सानपाड्यात रेयान शाळेतील विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी


नवी मुंबई :  सानपाडा विभागातील रेयान शाळेतील विद्यार्थ्यांनी ६ ऑगस्ट  २०२५ रोजी माजी आमदार संदीप नाईक. याच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील १८ वर्ष जुन्या निसर्गप्रेमी फाऊंडेशन सस्थेच्या पुढाकाराने  वृक्षारोपणाचा कार्यक्रम  संपन्न झाला. या संस्थेतर्भे दरवर्षी वृक्षरोपणाचा कार्यक्रम  केला जातो. यावर्षी माजी आमदार संदीप नाईक याच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेवून जवळ जवळ ४०  अशोकाची झाडे, १०  फणसाची झाडे, १०  पेरूची झाडे, १० जांभळांची झाडे, १० नारळाची झाडे, अशी एकुण झाडे ८०  मोठी झाडे दिली होती. ती झाडे निसर्गप्रेमी फाऊंडेशनच्या पाणी घालण्याच्या गाडीवर ठेवून विभागात  १४०  विद्यार्थ्यांना तसेच  १० शिक्षकांना बरोबर घेवून वाजत गाजत वृक्षदिंडी काढण्यात आली. या मिरवणूकीत स्थानिक जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. याप्रसंगी  विद्यार्थ्यांनी  मिलेनियम टावर्स बी टाईपच्या गेटवर पथनाट्य सादर करून जनतेची मने जिकली. या कार्यक्रमात अध्यक्ष सुनिल नाईक, सेक्रेटरी चंद्रकांत सरनोबत, खजिनदार सुमित राणे, सल्लागार आबा रणवरे,  कार्यकर्त्या डॉ. आर्चना शहा  आदी मान्यवरांची मार्गदर्शनपर  भाषणे झाली, तसेच याप्रसंगी  विनय पाटील, श्रीराम  मढवी, भालचंद्र पाटील आणि रेयान शाळेतील शिक्षक. मिलेनियम टॉवर्स बी टाईप सोसायटीचे अध्यक्ष बलजीत सिंग अरोरा आणि निसर्गप्रेमी फाऊंडेशनचे  कार्यकर्ते उपस्थित होते..सर्व मुलांना पौष्टिक अल्पोपहार देण्यात आला.  मुलांच्या हस्ते झाडे लावून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. वृक्षदिंडीस  सानपाडा विभागातील पोलिस डिपार्टमेंटने  मोलाचे सहकार्य केले.

आपला 

 मारुती विश्वासराव

टिप्पण्या