जळगांव येथे टेनिस व्हॉलीबॉल खेळांची राज्य पंच परीक्षा व कार्यशाळ उत्साहात संपन्न


जळगांव :-टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव व जळगाव जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन.वतीने, 16 जुलै जागतिक टेनिस हॉलीबॉल दिन व डॉक्टर व्यंकटेश वांगवाड यांच्या जन्मदिनानिमित्त. दि. 3 ऑगस्ट 2025 , रविवार रोजी   जळगांव येथे महाराष्ट्र राज्य टेनिस हॉलीबॉल पंच परीक्षा व कार्यशाळा आयोजन करण्यात आले. 

           कार्यक्रमास टेनिस व्हॉलीबॉल खेळांचे जनक डॉ व्यंकटेश वांगवाड, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी, राज्य उपाध्यक्ष रामेश्वर कोरडे, राज्य सचिव गणेश माळवे , उज्वल पाटील,  आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ व्यंकटेश वांगवाड म्हणाले खेळात खेळाडू सोबत पंच महत्वाचा घटक आहे. खेळातील न्याय देणारे महत्व चा घटक मानला जातो. 

पंचांनी आपला निर्णय योग्य द्यावा, कारण त्यावर खेळाडूंचे भवितव्य अवलंबून असते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव प्रशांत कोल्हे यांनी केले. 

आंतरराष्ट्रीय पंच प्रफुल्ल कुमार बनसोड यांनी टेनिस व्हॉलीबॉल इतिहास, नियम निमावली, पंचाचे कार्या बदल माहिती दिली. पंच समिती सचिव निलेश माळवे यांनी पंचांना गुणपत्रक बाबत माहिती दिली.

महाराष्ट्र तील 45 पंचांनी क्रीडा शिक्षक यांनी सहभाग नोंदविला होता. पंच/ क्रीडा शिक्षक यांना प्रमाण पञ  देण्यात आले.

जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा सचिव सदिप पाथरे, तुषार देशमुख, रामा हटकर, संदिप भोसले, उपस्थित होते.

टिप्पण्या