नांदेड दि. ८
अंजनी बहुद्देशीय प्रतिष्ठान तळणी संचालित अंजनी अभ्यासिकेचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी प्रियदर्शिनी मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष बालासाब माधसवाड आणि नांदेड पं. स. च्या माजी सदस्य सौ. शुभलक्ष्मी सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
बालाजीराव सूर्यवंशी तळणीकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वर्कशॉप कॉर्नर परिसरात, शांत ठिकाणी ही वातानुकूलित अभ्यासिका सुरू केली आहे. ही अभ्यासिका विद्यार्थ्यांच्या सेवेत २४ तास खुली असणार आहे. या अभ्यासिकेत एकाच वेळी २०० विद्यार्थी अभ्यास करू शकतात. गरजवंत विद्यार्थी अभ्यासिकेतील सुविधांचा लाभ घेऊन आपले भवितव्य घडवतील, असा विश्वास डॉ. सुरेश सावंत यांनी या वेळी व्यक्त केला.
उद्घाटन समारंभाला पांडुरंग शिंदे, गणेश पतंगे, माधव वायवळे यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अभ्यासिकेतील सुविधांबद्दल समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
addComments
टिप्पणी पोस्ट करा