मच्छीमार कामगारांसाठी जनजागृती शिबिर



 

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन व दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण आणि विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील भाऊच्या धक्क्याजवळील मॅलेट बंदर येथे १४ ऑगस्ट  २०२५  रोजी मासेमारीसाठी जाळी  व बर्फ पुरवठा करणाऱ्या कामगारांसाठी व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा या विषयावर शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिरात कामगारांना त्यांच्या कामामध्ये आरोग्य आणि सुरक्षेची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध सुविधांची माहिती उदा. ईश्रम कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, अटल पेन्शन योजना कार्ड, प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना कार्ड, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना कार्ड, पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना पेन्शन कार्ड इत्यादी काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांबाबत माहिती दिली. सप्टेंबर २०२५ मध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन आणि दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण आणि विकास मंडळ यांच्या माध्यमातून कामगारांसाठी शिबिर आयोजित करून प्रत्यक्ष कार्ड काढून दिली जाणार आहेत.

या शिबिरासाठी कामगार शिक्षण मंडळाचे अधिकारी श्री चंद्रसेन जगताप यांनी ह्या सर्व योजनांबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. याप्रसंगी युनियनचे जनरल सेक्रेटरी व दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण आणि विकास मंडळाचे सदस्य श्री .सुधाकर अपराज, युनियनचे सेक्रेटरी व कामगार शिक्षक दत्ता खेसे, कामगार शिक्षक बाळासाहेब लोहोटे यांनी मार्गदर्शन केले. युनियनचे संघटक सचिव व कामगार शिक्षक निसार युनुस मीर उपस्थित होते. शिबिराचे आयोजन या असंघटित कामगारांना संघटित करणारे युनियनचे धडाडीचे कार्यकर्ते बाबुराव जाधव यांनी केले.

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या