राज्यस्तरीय सेपकटाकरॉ स्पर्धेचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते उद्घाटन

 



दिनांक 29 ते 31 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र सेपकटाकरॉ असोसिएशन यांच्या मान्यतेने नांदेड जिल्हा सेपकटाकरॉ असोसिएशन नांदेड यांच्या सहकार्याने 25 वी सब ज्युनियर व 26 वी ज्युनियर महाराष्ट्र राज्य सेपकटाकरॉ स्पर्धा 2025-26 चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन नांदेड उत्तर चे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सचखंड गुरुद्वारा चे बाबा बालविंद्रसिंगजी तसेच विशेष अतिथी म्हणून जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले पोलिस अधीक्षक अभिनाशकुमार प्रमुख पाहुणे म्हणून राज्य संघटनेचे अध्यक्ष विपीन कामदार सचिव योगेंद्र पांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुशीलकुमार जाधव, उपाध्यक्ष रूपेश पाडमुख लिटिल स्कॉलर्स पब्लिक स्कूल चे संचालक रवींद्र रेड्डी सायन्स कॉलचे प्राचार्य एल.पी.शिंदे

आदी उपस्थित राहत आहेत. या स्पर्धेसाठी संपुर्ण महाराष्ट्रातून 25 मुलांचे 20 मुलींचे संघ 1000 खेळाडू पंच 30 जिल्हा सचिव संघ व्यवस्थापक प्रशिक्षक असे मिळून 1200 लोकांचा चंबू  नांदेड येथे सहभागी होणार आहेत या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनेचे सचिव प्रवीणकुमार कूपटीकर आयोजक रविकुमार बकवाड, गणेश माळवे,लक्ष्मण फुलारी , शुभम पाडदे, दर्शन हस्ती, वैभव शिंदे,आसिफ मिर्झा,दिलीप सूर्यवंशी,अनिकेत सरपाते,सुमेध गायकवाड,दिलीप हनुमंते,निशांत कदम,असंग जोंधळे,आरती ठाकूर,आदी जण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

टिप्पण्या
Popular posts
योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा तो बदनाम केला जातो ; महेबूब भाई आम्ही तुमच्या सोबत आहोत ! - शेख फेरोज
इमेज
उमरी तालुक्यातील बोरजूनी येथे प्रेम प्रकरणातून प्रियकर व मुलींची वडिलांकडून हत्या
इमेज
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या विजयी उमेदवारांना दिल्या शुभेच्छा*
इमेज
डाॅ.लोपामुद्रा,आपण महाराष्ट्र पोलीस दलाचीच नव्हे तर भारतीय पोलीस दलाची "डाॅ.विजश्री लोपामुद्रा" आहात!...डाॅ.हंसराज वैद्य...*
इमेज