नारायण शिंदे यांची कविता समाजाचे चारित्र्य चितारते' डॉ. सुरेश सावंत यांचे प्रतिपादन

'


नांदेड दि. १२

        

कविता ही कवीच्या आत्म्याचा स्वर असते. त्याचा सभोवताल जसा असेल, तशी कविता आकार घेते. ‘लुटीचा ताळेबंद’ मधील कविता ही शेतकऱ्याच्या वेदनेशी नाते सांगणारी कविता आहे. या कवितेला गाव आणि शेतशिवार यांचा लळा आहे. तिला सामाजिक दुःखाचा स्पर्श झाला असून कवी नारायण शिंदे यांची कविता समाजाचे चारित्र्य चितारते, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी मांडले. 

प्रा. नारायण शिंदे यांच्या ‘लुटीचा ताळेबंद’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले. त्या वेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीशभाऊ चव्हाण हे होते. मंचावर साहित्यप्रेमी दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर, कथाकार दिगंबर कदम, ह. भ. प. भास्करबुवा शिंदे, शिक्षण उपसंचालक राजेश शिंदे, कवी आत्माराम राजेगोरे, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, विजयकुमार चित्तरवार व कवी नारायण शिंदे यांची उपस्थिती होती. यशवंतराव चव्हाण विचारमंच आणि निर्मल प्रकाशन यांनी ह्या सोहळ्याचे आयोजन केले होते. 

प्रकाशन सोहळ्याची सुरुवात नांगर, ग्रंथ व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रकाशकीय प्रास्ताविक निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी केले. नारायण शिंदे यांनी मनोगतात आपली साहित्यिक वाटचाल सांगितली. मान्यवरांच्या सत्कारानंतर कथाकार दिगंबर कदम यांनी यशवंतराव चव्हाण विचारमंचाच्या कार्याचा आढावा घेतला. अध्यक्षीय समारोप करताना आ. सतीशभाऊ चव्हाण म्हणाले, की साहित्य हे परिवर्तनवादी असावे. कारण त्यातून समाजमन घडते. ही कविता रूढी, प्रथा, परंपरा यांना तिलांजली देऊन समाजाचे मन शुद्ध करणारी आहे. अशा साहित्याची आज समाजाला गरज आहे. नारायण शिंदे यांनी असेच लेखन करून समाज परिवर्तन घडवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कवीला  लेखनासाठी व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

या प्रकाशन सोहळ्याचे नेटके व बहारदार सूत्रसंचालन प्रा.डॉ.व्यंकटी पावडे यांनी केले. आभार प्रा. डॉ. भारत कचरे यांनी मानले.

प्रकाशन समारंभाला माजी प्राचार्य गोपाळराव कदम, प्राचार्य नागनाथ पाटील, प्राचार्य विजया देशमुख, माजी प्राचार्य राम जाधव, प्रा. प्रफुल्ल पाटील, कविता पाटील, उमराव शेळके, प्रांजली रावणगावकर, सुभाषराव पाटील जवळेकर, प्रा. डी. बी. जांभरुणकर, डी. बी. जामगे, संभाजी वडजे, मुकुंद बोकारे, कवी मनोज बोरगावकर, अनमोलसिंघ कामठेकर, डॉ. भगवान अंजनीकर, डॉ. बाळू दुगडूमवार, डॉ. कमलाकर चव्हाण, डॉ. माधव जाधव, डॉ. शंकर विभुते, उपप्राचार्य शिवसांब कापसे, शिवाजी अंबुलगेकर, डॉ. श्रीराम गव्हाणे, डॉ. अजय गव्हाणे, प्राचार्य व्‍यंकटी वाघमारे, डॉ. कल्याण पाटील, डॉ. मुकुंद बोकारे, डॉ. गणेश इजळकर, भीमराव राऊत, आनंदराव कल्याणकर, सुभाष गायकवाड, तानाजी हुसेकर, डॉ. प्रभाकर जाधव, गोपाळराव इजळीकर, प्रा. ए. टी. सूर्यवंशी, मोतीभाऊ केंद्रे, किरण शिंदे इ. विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या