उमरी तालुक्यातील बोरजूनी येथे प्रेम प्रकरणातून प्रियकर व मुलींची वडिलांकडून हत्या





उमरी : (म नेता)

उमरी तालुक्यातील बोरजूनी येथे प्रेम प्रकरणातून वडीलांने मुलगी व तिचा प्रियकर यांची हत्या करुन त्यांचे प्रेत एका विहिरीत फेकून दिले आहे. सदरील घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली असून उमरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक अंकूश माने यांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपीला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. उमरी तालुक्यातील बोरजूनी येथील खळबळजनक घटनेची सविस्तर माहिती अशी की, बोरजूनी येथील संजीवनी कमळे व लखन बालाजी भंडारे यांचे प्रेम प्रकरण होते. सदर प्रकरणांची माहिती मुलींच्या वडिलांना लागली. त्यानंतर मुलीचे वडिल मारोती सुरणे यांनी सदर मुलीचे लग्न उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे लावून दिले. लग्नानंतरही लखन भंडारे हा त्या मुलीच्या सासरी जाऊन तिची भेट घेत होता. सदर मुलीच्या वडिलांनी लखन भंडारे यास समजावून सांगितले होते. परंतु भंडारे हा त्या मुलीच्या सासरी जाऊन भेट घेत होता. २५ आगसट रोजी सकाळी लखन भंडारे हा गोळेगाव येथे जाऊन त्या मुलीला भेटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिच्या सासरच्या मंडळींनी लखन भंडारे यास ताब्यात घेऊन मुलीचे वडिल मारोती सुरणे यांना बोलावून घेतले. मुलीच्या वडिलांनी लखन भंडारे व संजीवनी कमळे हिस गावाकडे घेऊन जाऊन समाजावून सागतो म्हणून लखन भंडारे व संजीवनी कमळे हिस रस्त्याने गावाकडे येत असताना गोळेगाव येथील बापुराव पाटील यांच्या विहिरीजवळ दोघांना मारहाण करुन त्यांची हत्या केली. त्यांनतर त्यांचे प्रेत विहिरीत फेकून दिले. सदर घटनेची माहिती उमरी पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक अंकूश माने यांच्या समक्ष मुलींचा मृतदेह विहिरीतून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणात मुलीचे वडिल मारोती सुरणे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उमरी पोलिस ठाण्यात सुरू आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील व उपविभागीय पोलिस अधिकारी दशरथ पाटील यांनी भेट दिली आहे.

टिप्पण्या