सेलू तालुका बुद्धीबळ, योगासन,कॅरम क्रीडा स्पर्धा प्रारंभ


सेलू (.           )क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी 

गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, सेलू तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, सेलू

 यांच्या संयुक्त विद्यमाने  सेलू तालुका शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 प्रारंभ.

  

 सेलू तालुकास्तरीय शालेय योगासन ,बुद्धिबळ,कॅरम क्रीडा स्पर्धेचे उदघाटन दि. 20 ऑगस्ट रोजी नूतन इनडोअर क्रीडा हॉल येथे संपन्न झाले.

       स्पर्धेचे उदघाटन योगासन स्पोर्ट्स असोसिएशन चे सचिव डी डी सोन्नेकर, यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नूतन विद्यालय चे मुख्याध्यापक संतोष पाटील, प्रमुख उपस्थिती माजी मुख्याध्यापक चंद्रशेखर नावाडे, क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे ,तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक ,बुद्धिबळ प्रशिक्षक सचिन शहाणे

            सेलू तालुका शालेय योगासन, बुद्धीबळ, कॅरम क्रीडा स्पर्धेत 14/17/19 वयोगटातील १६ प्रशालेतील मुले/ मुली नी  एकुण 350 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील विजेत्या खेळाडू शालेय जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहेत.

स्पर्धेत पंच म्हणून रामा गायकवाड,सोमनाथ महाजन, देशपांडे, सचिव शहाणे, संजय भुमकर, राहुल घांडगे , अनुराग आंबटी,सुरज शिंदे, फारुकी, जुलाह खुदुस, वैभव रोडगे,पद्म  आदी ने काम पाहिले. 

      सेलू तालुका क्रीडा समिती अध्यक्ष तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण, क्रीडा स्पर्धा साठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या