डाॅ.लोपामुद्रा,आपण महाराष्ट्र पोलीस दलाचीच नव्हे तर भारतीय पोलीस दलाची "डाॅ.विजश्री लोपामुद्रा" आहात!...डाॅ.हंसराज वैद्य...*

*डाॅ.लोपामुद्रा दत्तराव आनेराव अर्थात डाॅ.सौ.लोपामुद्रा सुशील कुबडे याचा जन्म नांदेड जिल्ह्यातील रोहिपिंपळगावातील एका गरीब शेतकऱ्यांच्या पोटी झाला.यांचे शिक्षण पहिली ते चौथी जि.प.शाळा वसंतवाडी व पाचवी ते सातवी जि.प.शाळा रोहिपिंपळगाव येथे,आठवी ते दहावी कै.यादवरावजी  शाळा चिकाळा येथे तर पुढील शिक्षण मुदखेड व नायगाव येथे झाले.वडीलांना खेळाची आवड. पण स्वतः ला स्पर्धेत जाता आले नाही म्हणून. आपली चार एकर शेती पडीत ठेवून स्वतः त्यांचे प्रात्यक्षिक व सराव  घेत . मुला - मुलीत कुठलाही भेदभाव न करता त्यांनी आपल्या मुलीला मुलाच्या बरोबरीने त्या काळात शेतामध्ये सराव करून घेतला . अवघ्या वयाच्या चौदाव्या वर्षी लोपामुद्रानें सन-2000 मध्ये अखिल भारतीय स्पर्धेत रौप्य पदक मिळवून गावाचा व जिल्ह्याचा नाव लौकिक केले.खेळायच्या वयात 11 वर्षापासून त्यांनी शेतात, नदीत, टेकडीवर  सराव करून राज्यस्तरीय स्पर्धेत 35-40 वेळेस सुवर्णपदक जिंकले.राष्ट्रीय ढआंतरराष्ट्रिय स्पर्धेत 15-20 विजेतेपद मिळवून आपल्या गावाचे व महाराष्ट्राचे नाव उज्वल केले .सन 2006 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात त्यांची निवड झाली.2007 मध्ये महाराष्ट्र पोलीस स्पर्धेत सहा विजेते पदकं मिळवून त्यांनी "जनरल चॅम्पियनशिप" मिळविले. लागोपाट दोन वर्षे अखिल भारतीय स्पर्धेत सुवर्ण,रौप्य पदकं मिळवून आपल्या राज्याचे व पोलीस दलाचेही नाव त्यांनी उज्वल केले. सन 2010 मध्ये चांगल्या कामगिरीमुळे "पोलीस महासंचालक पदकाने" जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केले गेले. तसेच अनेक मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदकं मिळविले. आपले कर्तव्य निभावत, आपल्या जोडीदाराच्या खांद्याला खांदा लाऊन सुखाच्या संसाराचा गाडा पेलत, आपल्या दोन आपत्यांचे पालन पोषण करत, शारीरिक शिक्षण या विषयात त्यांनी Phd अर्थात डाॅक्ट्रेट उपाधी प्राप्त केली.*     

*त्यांनी  "भरोसा सेल" च्या माध्यमातून अनेकांचे संसार जोडून उभे केले आहेत.  एक महिला असून त्यांनी गिर्यारोहन क्षेत्रातही मोठे तथा नेत्रदिपक यश संपादन केले आहे ही मोठी भूषणावह बाब म्हणावी लागेल! त्यांच्या बोलण्यात नेहमी मा. शहाजी उमाप साहेब व मा. रविंद्रकुमार सिंघल साहेब असतात. त्या त्यांना आदर्श मानतात. त्यांनी गिर्या रोहनात कसे यश संपादन केले हे त्यांच्याच शब्दात आपण पाहूयात.*

.                                               *"मी 15/08/2025 रोजी अर्थात देशाच्या 79 व्या  स्वातंत्र्य दिनच्या दिवशी  आफ्रिकास्थित,जगातील सर्वात उंच १९,३४० फूट(जवळ जवळ 120 मैल) "माउंट किलीमांजारो" या पर्वताचे शिखर पादाक्रांत  केले व भारताचा तिरंगा फडकवून स्वातंत्र्य दिन साजरा केला.  महाराष्ट्र पोलीस दलाचा झेंडाही फडकावला. तसेच त्यांनी "आत्मनिर्भय भारत मोहिम" यशश्वी केली. तसेच " STONG MOTHER-STRONG NATION" हेही सिद्ध करून दाखविले

*महिलांना काहीतरी सिद्ध करून दाखवायचं आहे तर मग फक्त आरशात पाहून नाही, तर मेहनत करून यश मिळतं हे त्यांनी जगाला दाखवून दिले .विरसेव समाजाचे प.पू. महात्मा बसवेश्वर महाराज यांचा झेंडाही तिथे फडकवून समाजाचे नाव उंचाविले."कृष्ण जन्माष्टमी" किलीमांजारो शिखरावर श्रीकृष्णाच्या फोटोच्या सहायाने साजरी केली!

*या मोहिमे बद्दल त्यांच्याच शब्दात पाहू यातः--                     "मी या मोहिमेची सुरवात 11 ऑगस्ट ला  "मोशी किलीमांजारो इंटरनॅशनल गेट" वरून केली. दर रोज अंदाजे 90 किमी अंतर आकाशात पायी चालत, शेवटचा टप्पा 14 ऑगस्ट ला रात्री 12 वाजता सुरु करुन 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता मोहीम किलीमंजारो पर्वतावर उन्हे 15-20 अंश वातावरणात संपन्न झाली. भारत देशाचा तिरंगा व महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज अभिमानाने फडकवला! वीरसेव धर्माचा ध्वजही फडकावला!"

*या मोहिमेत मला आलेला अनुभव म्हणजे आज 15/08/2025 हा दिवस माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय आहे. तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. "मेहनती शिवाय पर्याय नाही"! खडतर जंगल, माळ, दगड, सर्व बाजुंनी बर्फ, पूर्ण चढ आणि एकले पणा! किलीमांजारो शिखर चढताना शेवटी 2 किलोमिटर अंतर राहिले होते. थंडीने हात पाय सुन्न झाले. शरीर थंड पडले होते.15-20 अंश ऊन्हे थंडी मध्ये चालल्यामुळे श्वासोच्छ्वास घेणेहि अवघड झाले होते.ही मोहिम अर्धवट सोडून परत जावे असे क्षणभर वाटले.पण त्यावेळी माझ्या मुलांचा चेहरा समोर आला. माझ्या मुलांनी या मोहिमेसाठी त्यांचा स्वतःचा गल्ला फोडून मला पैसे दिले त्या चिमुकल्याला काय वाटेल? एका आईला हिमंत येण्यासाठी अजून काय पाहिजे? तेव्हा कुठली एनर्जी आली हे मला कळले नाही!पाय आपोआप शिखराकडे पडू लागले. आणि मी हळूहळू शिखराकडे निघाले. ही मोहीम आपण यशस्वी नाही केली तर एवढे कष्ट केलेले वाया जाणार आणि या मोहिमेसाठी मी माझ्या गळ्यातील सोनं मोडून आले, माझ्या पतीला काय वाटेल?अनेक दानशूर व्यक्तीनी केलेल्या अर्थ सहायाचे काय?मी अनेक लोकांकडून या मोहिमे साठी अर्थिक मदत घेऊन आले आहे,त्याचे काय?त्याचे पैसे कोण व कसे परत करेल? लोक काय बोलतील? या विचारांनी मी क्षणभर गोंधळुन गेले. माझ्यापुढे एक मोठे आव्हानच उभे होते. काही झाले तरी चालेल पण ही मोहीम यशस्वी पार पाडायचीच! अखेर ती वेळ आली. मी जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण झाले! आणि मी यशस्वीरित्या किलीमांजारो शिखरावर पोहोचले! तेव्हा किलीमांजारो कडे पाहून माझे मन सुन्न झाले. थोड्यावेळ मला काही समजतच नव्हते की खरंच मी इथं पोहोचले का? थोडा वेळ मी खाली बसले आणि पुन्हा पाहिले तेव्हा खरंच मी आफ्रिका खंडातील किल्लीमांजारो शिखरावर उभी होते तो क्षण माझ्यासाठी अत्यंत आनंदही होता!तो आनंद मी शब्दात मांडूच शकत नाही!.

*ही मोहीम  पार पाडण्यासाठी मा.आयुक्त श्री . रवींद्र कुमार सिंगल सर नागपूर,मा. पोलीस महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप सर नांदेड,मा. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार नांदेड, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.सुरज गुरव, कंधार उपविभागीय अधिकारी डॉ.अश्विनी जगताप मॅडम , पोलीस स्टेशन उस्माननगर प्रभारी अधिकारी श्री. नीलपत्रेवार सर,पो.उ.नि.गाडेकर सर,ज्येष्ठ थोर समाज सेवक तथा नांदेड भूषण डॉ. हंसराज वैद्य , ज्योती जैन मॅडम,सुचित्रा भगत मॅडम तसेच माझे नातेवाईक, सहकारी ,पत्रकार बंधू सर्वांनी वेळोवेळी मदत करून मला मोहीम यशस्वी होण्यासाठी खूप मोठे धैर्य तथा सहकार्य केले आहे. सर्वांच्या मी ऋणांतच रहाणे पसंत करते! फक्त आभार मानते .ही मोहीम श्री आनंद बनसोडे सोलापूर 360 explorer यांनी आयोजित केली होती.

*शेवटी मला एव्हरेष्ट पर्वत पादाक्रांत करण्यासाचे बळ व असेच सहकार्य आपल्याकडून मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून थांबते🙏.*

*आपलीच,*

*लोपामुद्रा.*

*🙏🇮🇳जय हिंद!जय महाराष्ट्र!!जय पोलीस दल!!!🇮🇳🙏.*

टिप्पण्या