परभणी (. )जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय अजिंक्य बॉक्सिंग स्पर्धेत परभणी जिल्हा संघाच्या सहा बॉक्सरने सहभाग नोंदवून सहापैकी चार पदक मिळविली अशी माहिती जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव धनंजय बनसोडे यांनी पत्रकार द्वारे दिली. महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटना व जिल्हा जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या पंधरा वर्षाखालील मुला मुलींच्या व तेरा वर्षात 13 व अकरा वर्षाखालील मुलींच्या राज्यस्तरीय अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा परभणी जिल्हा संघाने दोन सुवर्ण व दोन रौप्य पदक पटकावले आहे. गेल्या चार वर्षात या वयोगटात स्पर्धा आयोजित नसल्यामुळे या वयोगटातील खेळाडूंचे प्रचंड नुकसान होत होते. पण महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटना कमिटी अंतर्गत आयोजित या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड ब्रेक 650 खेळाडू सहभागी झाले होते .प्रचंड स्पर्धा असताना देखील परभणी जिल्हा संघाने चार पदक पटकावली हे सगळे श्रेय बॉक्सिंग प्रशिक्षक म्हणजे बनसोडे व सहाय्यक प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू मोनाली धनगर यांनी मार्गदर्शन केले .
या स्पर्धेतील सुवर्णपदक खेळाडू तनिष्का डापकर श्रेयस सोनवणे कास्यपदक विजेते शांभवी गळाकाटू ओजस महाराज, श्रेयस गळाकाटु,श्रेया सोणवने ,श्रीनिवास मुंढे हे सर्व खेळाडू प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथील धनंजय बॉक्सिंग अँकॅडमी मध्ये सराव करतात ,
या यशाबद्दल परभणी जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष आ. डॉ. राहुल पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती गीता साखरे ,महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, विजय तिवारी, किशोर ढोके, राजेश्वर मठ्ठपल्लु,शुभम मुंदडा,ओम संदेश ऐडके , संजय मुंढे,सुयश नाटकर, रोहण औढेकर ईतर पादाधाकार्यांनी कौतुक केले वपुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या
addComments
टिप्पणी पोस्ट करा