सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने ध्वजारोहण

नवी मुंबई  : सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघ व गार्डन परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट २०२५  रोजी रेल्वेमधून सेवानिवृत्त झालेले रेल्वे पोलीस इन्स्पेक्टर कांताराम धंद्रे व हवाई दलामधून सेवानिवृत्त झालेले श्री. कदम,  सेवानिवृत्त सैनिक श्री. पवार यांच्या शुभहस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, स्वातंत्रनंतरचा काळ,  देशाची आर्थिक परिस्थिती, भारत देशाची महासत्ताकडे वाटचाल, कृषिप्रधान देश, सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा देश अशा विविध विषयावर सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम,  उपाध्यक्ष बळवंतराव पाटील, प्रभारी सचिव शरद पाटील,  खजिनदार विष्णुदास मुखेकर,  उपाध्यक्ष डॉ. विजया गोसावी, समाजसेवक पांडुरंग आमले,  कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव,  महाराष्ट्र शासनाचे माहिती विभागातील सेवानिवृत्त महासंचालक देवेंद्र भुजबळ, सानपाडा हास्य क्लब योगाचे शिक्षक भरत खरात आदी मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. कार्यक्रमाचे निवेदन संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे यांनी केले. याप्रसंगी बल्लाळेश्वर सहकारी पतपेढीचे अध्यक्ष आनंद गावडे, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे सहखजिनदार सुभाष बारवाल, पत्रकार सुब्रमण्यमआदी मान्यवर उपस्थित होते. झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक,  सानपाडा गार्डन परिवार तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पण्या