मुंबई बंदर विश्वस्त सहकारी पतपेढी निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय


 मुंबई बंदरातील मुंबई बंदर विश्वस्त कर्मचारी सहकारी  पतपेढी मर्यादित या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक ११ ऑगस्ट २०२५  रोजी चूरशीची होऊन या निवडणुकीमध्ये  स्थानिय लोकाधिकार समिती सहकारी पॅनलचे  १५ पैकी ११  उमेदवार तर अपना पॅनलचे ४  उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीमध्ये  स्थानिय लोकाधिकार समिती सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत   स्थानिय लोकाधिकार समिती सहकार पॅनलचे सर्वसाधारण गटात संदीप चेरफळे,अनंत (अप्पा) भोसले,अजित झाजम,राकेश भाटकर, मनिष पाटील,संदीप गावडे,मिलिंद रावराणे, महिला राखीव गटात सुजाता दळवी, इतर मागासवर्गीय गटात प्रशांत वारेकर, अनुसूचित जाती/जमाती गटात राजेश जाधव, भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष मागास प्रवर्ग गटात नामदेव सरगर, असे  ११ उमेदवार विजयी झाले आहेत. तर अपना पॅनलचे सर्वसाधारण गटात मोहन देऊळकर, संदीप घागरे, नितीन कळमकर, महिला राखीव गटात योगिनी दुराफे हे ४  उमेदवार विजयी झाले आहेत.

सर्व विजयी उमेदवारांचे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, सेक्रेटरी दत्ता खेसे, प्रदीप नलावडे,मुंबई पोर्ट प्राधिकरण  स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर, कार्याध्यक्ष बबन शिरोडकर,  सरचिटणीस सूर्यकांत शिंदे,  मुंबई पोर्ट ट्रस्ट एस सी, एस टी, अँड वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी गिरीश कांबळे, अंकुश कांबळे,अपना पॅनलचे प्रमुख विजय आचरेकर,बबन मेटे यांनी  सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले असून,  सर्व मतदारांचे  आभार मानले आहेत.

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या