गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे, ज्येष्ठ सहकार तज्ञ व सीए के .आर .बिंद व राजेंद्र जाधव यांना अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित.


मुंबई( प्रतिनिधी) गुणवंत कामगार व विशेष कार्यकारी अधिकारी प्रभाकर तुकाराम कांबळे ज्येष्ठ सहकार तज्ञ व सीए किशोरीलाल . आर. बिंद व राजेंद्र सहदेव जाधव यांना जय महाराष्ट्र पत्रकार संघ, वृत्तपत्र लेखक कवी महासंघ व दैनिक झुंजार लेखनी यांच्या संयुक्त वतीने  सन 2025  चा "महाराणी अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्कार " आमदार अशोक भाऊ धात्रक व भारत सरकार  सेंनसर बोर्डाचे सदस्य विलास खानोलकर सामाजिक कार्यकर्त्या स्वाती ओक यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले असून  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मैत्री संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र पत्रकार संघाचे सचिव सुरज भोईर होते. 

                जय महाराष्ट्र पत्रकार व वृत्तपत्र लेखक कवी महासंघ दैनिक झुंजार लेखणी यांच्या वतीने नुकताच मुंबई मराठी पत्रकार संघ पत्रकार भवन येथे महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या  गौरवशाली 300 व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी गुणवंत कामगार ,विशेष कार्यकारी अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी,राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र राज्य  मुंबई जिल्हाध्यक्ष व वनिता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर तुकाराम कांबळे ,सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ सहकार तज्ञ व सीए  किशोरीलाल आर. बिंद, सामाजिक कार्यकर्ते व सम्यक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र सहदेव जाधव, गुणवंत कामगार राजेंद्र कांबळे, ज्येष्ठ समाजसेवक नागोराव शिखरे सामाजिक कार्यकर्ते सुशांत सकपाळ, संतोष मटकर व दशावतारी  नाट्य कलावंत गौतम कदम यांना महाराणी अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून या कार्यक्रमाला आमदार अशोक भाऊ धात्रक, सहायक प्रकल्प अधिकारी तेजस्वी गलांडे होळकर अभिनेत्री जारा खान  सामायिक कार्यकर्त्या स्वाती ओक भारत सरकार सेंसर बोर्डाचे सदस्य विलास खानोलकर धडक कामगार युनियन चे संस्थापक व दैनिक मुंबई मित्र चे संपादक अभिजीत राणे झुंजार लेखणीचे संपादक संतोष धुरंदर पोलीस मित्र दिलीप नारद तेजस्विनी महिला मंडळाच्या अध्यक्षा  संगीता शिंदे समाजसेविका संगीता गुरव शिवश्री विजय भोसले या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सर्वांना महाराणी अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

             तसेच कार्यक्रमाला आलेल्या प्रमुख मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संतोष  खरटमोल  व सर्व उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांचे सुरज भोईर यांनी आभार मांडले असून कार्यक्रमासाठी पर्यावरण मित्र तानाजी फणसे आदर्श शिक्षिका मनीषा मांढरे अभिनेत्री निशा जाधव विजय केदासे मुक्त पत्रकार राजेश जाधव विनायक जावळेकर साई रामपूरकर छाया मॅडम सामाजिक कार्यकर्त्या कल्पना शिंदे गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे राजेंद्र कांबळे या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले असून शेवटी सर्वांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आले. पुरस्कार प्राप्त  सर्व कार्यकर्त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे .

टिप्पण्या