नवी मुंबईतील सानपाडा नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम संपन्न

नवी मुंबई :  नवीन मुंबई सानपाडा येथील अभ्यासू  व्यक्तिमत्व, चांगले  वक्तृत्व आणि सामाजिक कार्याने प्रसिद्ध असलेले  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख  मिलिंद सुर्यराव यांच्या वाढदिवसानिमित्त सानपाडा विभागातील नागरिकांकरिता ११ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.००  ते ४.०० वाजेपर्यंत सेक्टर -८ येथील केमिस्ट भवन सभागृहात मोफत आरोग्य तपासणी शिबीर, दंत चिकित्सा शिबीर,  कान-नाक-घसा तपासणी तसेच महिलांकरिता मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी केमिस्ट भवन ब्लड बँक, सुरज हॉस्पिटल सानपाडा, टाटा हॉस्पिटल, डायग्नोपेन लॅब यांचे विशेष सहकार्य लाभले.

त्याचप्रमाणे वाढदिवसाच्या निमित्ताने युवासेना सानपाडा विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात ७६ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले. याप्रसंगी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता शिवसेना उपनेते, मा. राज्यमंत्री विजय नाहटा, उपजिल्हाप्रमुख  दिलीप घोडेकर, संजय भोसले, दिपक सिंग, विसाजी लोके, डॉ. आर. एन. पाटील   उपशहरप्रमुख  रामचंद्र पाटील, संतोष मोरे, विनोद मुके गार्डन ग्रुपचे रणवीर पाटील आणि सहकारी तसेच बेलापुर विधानसभा क्षेत्रातील सर्व मान्यवर पदाधिकारी आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

आपला

मारुती विश्वासराव

टिप्पण्या