*पिंच्याक सिलॅट खेळात महाराष्ट्र राज्याने (3 सुवर्ण,4 रजत व 5 कांस्य) पदके*
क्रीडा प्रतिनिधी (गणेश माळवे)-खेल मंञालय भारत सरकार व दिव दमन दादर नगर हवेली सरकार यांच्या वतीने दिवच्या घोघला बिच समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्या पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स स्पर्धेत
व पुर्ण खेळाच्या गुणतालिकेत २० पदकासह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी राहून उपविजेता ठरला.
प्रथमच दिव घोघला बीच येथे 19 ते 24 मे 2025 पर्यंत पार पडलेल्या पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स स्पर्धेत महाष्ट्राचे एकूण 78 खेळाडू सहभागी झाले आहेत.ह्यात 48 पुरूष व 30 महिला खेळाडूंचा समावेश होता.तरी पिंच्याक सिलॅट खेळातील १५ खेळाडूंची निवड महाराष्ट्र संघाकडून झाली आहे.एकूण 8 खेळांचा ह्यामध्ये समावेश होता ह्या स्पर्धेत बीचसॉकर,बीच कब्बडी,बीच हॉलीबॉल,बीच सेपक टकरा, बीच पिंच्याक सिलॅट, सागरी जलतरण, रस्सीखेच, मलखंब ह्या क्रीडाप्रकरांचा समावेश होता. पिंच्याक सिलॅट खेळप्रकराने 3सुवर्ण,4 रजत,5 कांस्य पदके ,एकूण 12 सर्वाधिक पदके देऊन महाराष्ट्र संघाला गुणतालिकेत टॉप 2 मध्ये ठेवले ,तसेच ओपन वॉटरस्विमिंग खेळप्रकराने 2 सुवर्ण,1 रजत, 2कांस्य पदके ,एकूण 5 पदके देऊन उत्कृष्ठ कामगिरी केली, व बीच कबड्डी मध्ये 2 कांस्य,
बीच सॉकर मध्ये 1कांस्य पदक पटकावून सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली.
विजयी खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे:
*सुवर्ण पदक विजेते:
(गंडा इव्हेंट) प्रकारात
रिया चव्हाण ,प्राजक्ता जाधव.
(टैंडिंग इव्हेंट फाईट )
वैभव काळे ,जयश्री शेट्ये
*रजत पदक विजेते:
(गंडा इव्हेंट) रामचंद्र बदक ,
सचिन गर्जे,
(रेगु इव्हेंट)ओमकार अभंग ,
वेभव काळे ,अंशुल कांबळे
(टैंडिंग इव्हेंट फाईट)रामचंद्र बदक,अंशुल कांबळे,
*कांस्य पदक विजेते:
(सोलो इव्हेंट)किरणाक्षी येवले
वैभव काळे,
(तुंगल इव्हेंट )कृष्णा पांचाळ
(टैंडिंग इव्हेंट फाईट)मुकेश चौधरी,सम्यक मार्कंडेय
संघ व्यवस्थापक शंकर भास्करे,प्रशिक्षक:-ओम शिंदे , आशिता यादव यांनी काम पाहिले.
बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी
महाराष्ट्र पथक प्रमुख तथा क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे ,दिव दिमन दादर नगर हवेली क्रीडा अधिकारी अक्षय कोटलवार, महाराष्ट्र क्रीडा अधिकारी अरुण पाटील, शंकर भास्करे,पिंचक सॅलेट फेडरेशन चे अध्यक्ष किशोर येवले, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, अनिता कदम, नेहा साप्ते , गणेश माळवे , स्वाती बेने, उपस्थित होते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा