महाराष्ट्र शासन व क्रीडा विभाग खेळाडूंच्या सदैव पाठीशी उभे आहे. खेळाडूंनी आपली प्रगती करत राहावे.
भारत सरकार माध्यमातून खेळाडूंना शालेय स्तरावर स्कुल गेम्स, त्यानंतर खेलो इंडिया युथ गेम्स, खेलो इंडिया बिच गेम्स अशा विविध क्रीडा स्पर्धा खेळून पुढील ऑलिम्पिक स्पर्धेसाठी चांगले खेळाडू निर्माण होत आहेत.
दिव दमन दादर नगर हवेली सरकारने अतिशय उत्कृष्ट खेलो इंडिया बिच गेम्स चे आयोजन केले आहे. खेळाडूंची भोजन, निवास, व्यवस्था उत्तम दर्जाचे दिली. खेळाडूंना बिच क्रीडा स्पर्धा चा आनंद मिळाला.
महाराष्ट्र राज्य संघाची कामगिरी समाधान कारक केली आहे. पिंचक सॅलेट १२ पदक, बिच कबड्डी २ पदक, स्विमिंग ५ पदक, तर सॉकर १ पदक, एकुण २० पदक प्राप्त करून महाराष्ट्र उपविजेता ठरला.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्ताञय भरणे, क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा. क्रीडा आयुक्त हीरालाल सोनावणे, सहसंचालक क्रीडा सुधीर मोरे यांच्या सहकार्याने आज महाराष्ट्र राज्य ७ वी खेलो इंडिया युथ गेम्स बिहार मध्ये विजेता तर १ल्या खेल़ो इंडिया बिच गेम्स दिव मध्ये उपविजेता ठरला.
*नवनाथ फरताडे ( महाराष्ट्र राज्य पथक प्रमुख तथा क्रीडा उपसंचालक मुंबई)*
addComments
टिप्पणी पोस्ट करा