संशोधन व सामंजस्य करार ही काळाची गरज* -शास्त्रज्ञ डॉ.संजय कामटेकर


नांदेड:( दि.१५ सप्टेंबर २०२४)

           श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व इंटरशिप अँड एमओयू कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने 'ऑपॉर्च्युनिटीज ऑफ एम.ओ.यु. अँड लींकेजेस विथ इंडस्ट्री' या विषयावर एक दिवसीय  चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

           चर्चासत्राचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य तथा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री.नरेंद्र चव्हाण, प्रमुख वक्ते एमआयटी, पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ.संजय कामटेकर व शास्त्रज्ञ डॉ.भारत काळे उपस्थित होते.

           प्रमुख वक्ते डॉ.संजय कामटेकर यांनी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन संशोधन कार्य त्याचबरोबर संशोधन कार्याचे वेगवेगळ्या संस्थांशी संलग्निकरण करण्याबाबतचे महत्त्व विशद केले.  

          डॉ.संजय कामटेकर हे मागील ३७ वर्षे अमेरिकेत शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. त्यांनी अमेरिकेत जे संशोधनकार्य केलेले आहे; त्याबद्दल सुद्धा त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

          श्री.नरेंद्र चव्हाण यांनी, शेतीतील कामासाठी संशोधन त्याचबरोबर शेती व्यवसाय व शेतीवर अवलंबित उद्योग निर्मितीसाठी तंत्रज्ञान या विषयावर विचार व्यक्त केले. 

          एमआयटी, पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. भारत काळे यांनी आपल्या उत्साहपूर्ण मार्गदर्शनामध्ये, मी कसा घडलो, व कुठल्याही कमतरतेचा उहापोह न करता; आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या ठिकाणी, सतत कार्य व संशोधन केल्यामुळे मी कसा या पदापर्यंत पोहोचलो, याचे अतिशय सविस्तर मार्गदर्शन केले. ऊर्जा, कृषी, कृत्रिम बुद्धिमत्ता, भौतिक विज्ञान अशा विविध विषयांतील बदलांचा मानवी जीवनावर होणारा सकारात्मक व नकारात्मक परिणाम याबद्दल देखील आपले मत व्यक्त केले.

           अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, महाविद्यालयात असणाऱ्या संशोधन सुविधा तसेच एनईपी  संदर्भात आपले विचार व्यक्त केले. त्याचबरोबर महाविद्यालयात घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांकेंद्रित उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले. 

          प्रश्नोत्तर सत्रात प्राध्यापकांनी आपल्या शंका तज्ञ मार्गदर्शकांना विचारल्या. त्यामध्ये प्रामुख्याने फार्मसी महाविद्यालय, यशवंत महाविद्यालय, इंदिरा गांधी महाविद्यालय, सिडको, शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर आणि  राजीव गांधी महाविद्यालय, मुदखेड येथील प्राध्यापकांनी प्रश्न विचारले.

           सूत्रसंचालन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सह-समन्वयक डॉ.माधव दुधाटे यांनी केले तर आभार  इंटरनशिप व एमओयु कमिटी प्रमुख डॉ. विजय भोसले यांनी मानले.

          कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे आणि डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ.साहेबराव शिंदे, डॉ. विजय भोसले, डॉ.संदीप खानसोळे, डॉ. श्रीकांत जाधव, डॉ.अजय मुठे आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष सदस्यांनी परिश्रम केले तसेच प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील व डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.

          कार्यशाळेस डॉ.एम.ए.बशीर, डॉ.संजय ननवरे, डॉ.संभाजी वर्ताळे, डॉ.सुभाष जुन्ने, डॉ.शिवराज शिरसाठ, डॉ.संतोष मोरे, डॉ.मदन अंभोरे, डॉ. अनिल कुवर, डॉ.प्रवीणकुमार मिरकुटे,  डॉ. बी.बालाजीराव, डॉ.एम.एम.व्ही.बेग, डॉ. धनराज भुरे, डॉ.एन.आर.जयस्वाल, डॉ.एम.एस.कदम, डॉ. रत्नमाला मस्के, प्रा. भारती सुवर्णकार, डॉ. चिकटे, प्रा. नितीन नाईक आदींची उपस्थिती होती

टिप्पण्या