*गंगाखेड (प्रतिनिधी)*
शहरातील गीतामंडळ येथे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी दिनांक 12 मे रोजी बुद्ध पोर्णिमेचे औचित्य साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सवंगडी कट्टा सामाजिक समूह गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .
शिबिराची सुरुवात ॲड गौतम अवचार यांनी बुद्धवंदना घेऊन केली . या प्रसंगी डॉ.हेमंत मुंढे,डॉ.किशन गारोळे,डॉ.केशव मुंढे,डॉ.किशोर कुगणे,प्रकाश घन,रमेश औसेकर,गजानन महाजन, मनोज नाव्हेकर तसेच संघचालक अतुल तुपकर,कार्यवाहक सचिन सुरवसे,बालाजी शिंदे,सचिन कोटलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक बांधिलकी जपत यात *73* रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदात्यांना प्रशांत काबरा यांचेकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
सवंगडी कट्टा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने मागील 5 वर्षांपासून बुद्ध पोर्णिमेचे औचित्य साधत सामाजिक कर्तव्य बजावत शिबिराचे आयोजन करत आहे.यामुळे जिल्हा रक्तपेढीतील रक्ताचा तुटवडा दूर होऊन अनेक गरजू गरीब रुग्णांना फायदा होऊन रुग्णांना मदत होणार आहे.
दोन्ही संस्थेच्या माध्यमातून वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात ज्यामध्ये शालेय साहित्य वाटप,वृक्षारोपण,वारकरी आरोग्य शिबीर,रुग्ण साहित्य सेवा केंद्र अश्या कार्याचा सहभाग आहे.
शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सवंगडी कट्टा सामाजिक समूह गंगाखेड च्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा