भारतीय सैन्याचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सानपाड्यात सर्वपक्षीय तिरंगा रॅली


जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे भारतीय  निरपराध नागरिकांवरती दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड  हल्ल्याचा भारतीय सैन्याने " ऑपरेशन सिंदूर "च्या माध्यमातून दहशतवादी अड्डा उध्वस्त करून बदला घेतला.  देशाच्या सीमेवर सुरू असलेल्या युद्धात आपले सैनिक दिवस-रात्र डोळ्यात तेल घालून भारताचे व आपले रक्षण करीत आहेत. त्यांचा आत्मविश्वास व मनोधैर्य  वाढविण्यासाठी, त्यांनी युद्धात मिळविलेल्या विजयाचे कौतुक करण्याकरिता तसेच या युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या शहिदांना मानवंदना देण्याकरिता  सानपाड्यात १५  मे २०२५  रोजी सर्वपक्षीय तिरंगा रॅली काढण्यात आली होती.

या तिरंगा रॅलीत भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष राजेश राय,  भाजपचे समाजसेवक भाऊ भापकर , भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष सुनिल  कुरकुटे , समाजसेवक पांडुरंग आमले , शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित सावंत , उपजिल्हाप्रमुख विसाजी लोके , गणेश  पावगे,   राजू  सैद , रामचंद्र पाटील,  मनसेचे योगेश शेट्ये, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव ,  मराठी नाट्य व चित्रपट कलाकार शिवाजी पाटणे, समाजसेवक सूर्यकांत झेंडे,  अशोक कवडे , शामराव मोरे,  समाजसेविका शैलाताई पाटील , समाजसेवक राजेश ठाकूर ,  जगदीश पाटील, चंद्रकांत सरनोबत,  रुपेश मढवी , सानपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष शिवाजी ढमाले,  समाजसेविका स्नेहा पवार , संगीताताई माळवे, वृषाली चव्हाण,  दिपीका  बाम्हणे, सानपाडा गार्डन ग्रुप ७.५० चे खजिनदार व  समाजसेवक रणवीर पाटील, सानपाडा  हास्य क्लब योगाचे शिक्षक भरत खरात,  आदी मान्यवर व सानपाडा रहिवाशी  सहभागी झाले होते.

सदर तिरंगा रॅली सानपाडा सेक्टर ३  बधाई स्वीट कॉर्नर चौक येथून निघून घोषणा देत  एमपीसिटी हॉस्पिटल,  न्यू मिलेनियम हॉस्पिटल.  मिलेनियम टॉवर,  छत्रपती शिवाजी महाराज चौक सेक्टर १० येथे रॅलीचा समारोप झाला. याठिकाणी भारतीय पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या जवानांना सानपाडा रहिवाशांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या