*गंगाखेड (प्रतिनिधी)*
श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या तीन दिवसीय प्रवचन मालेचे आयोजन दिनांक 16, 17 व 18 मे रोजी शहरात करण्यात आले आहे. ही प्रवचन माला सद्गुरु सेवा समिती गंगाखेड च्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. प्रवचन मालिकेतील विषय श्रीमद भागवतातील यदु अवधूत संवाद, तसेच श्रीमद्भागवतातील श्री दत्तात्रयांचे चोवीस गुरु हा असणार आहे .या प्रवचनमालेचे ठिकाण श्रीकृष्ण श्रेया मंगल कार्यालय, राजवाडा, गोदातट या ठिकाणी सायंकाळी 6 ते 8 च्या दरम्यान संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त श्रोत्यांनी या सद्गुरूंच्या प्रवचनमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन सद्गुरु सेवा समिती गंगाखेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा