परभणी (. )दि.10 ते 18 मे या कालावधीत बी. रघुनाथ महाविद्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि चेतननंद टेबल टेनिस क्लब यांच्यावतीने मोफत उन्हाळी टेबल टेनिस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.या उन्हाळी टेबल टेनिस प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन बी रघुनाथ महाविद्यालय परभणी येथे संपन्न झाले या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री ओम प्रकाश डागा यांच्या हस्ते संपन्न झाले. या शिबिरात ४५ खेळाडूंनी सहभागी झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक सोनी, श्री सतीश झरकर, टेबल टेनिस संघटनेचे कोषाध्यक्ष प्रा.डॉ.माधव शेजुळ , बी रघुनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास सोनवणे प्रशिक्षक चेतन मुक्तावर प्रा.डॉ.विनोद गणाचार्य हे उपस्थित होते. यावेळी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू आद्या बाहेती हिचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी रघुनाथ महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ.विनोद गणाचार्य यांनी केले व आभार चेतन मुक्तावार यांनी मानले.
परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, टेबल टेनिस असोसिएशन गणेश माळवे यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
addComments
टिप्पणी पोस्ट करा