प्रभाकर मेरे यांचा सत्कार

 नवी मुंबई - दि न्यू इंडिया ॲस्सुरन्स कंपनी लि. चे बिजनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह व  मिलेनियम टॉवर सोसायटीचे मॅनेजिंग कमिटी मेंबर प्रभाकर भेरे हे  ३३ वर्षे  निष्कलंक नोकरी 

करून ५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वेच्छा निवृत्ती योजनेच्या  अंतर्गत सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने सानपाडा येथील मिलेनियम टॉवर बी टाईप हाउसिंग सोसायटीच्या वतीने  अध्यक्ष बलजीत सिंग अरोरा,  सचिव सचिन तावडे, मॅनेजिंग कमिटी मेंबर्स शिवाजी पाटणे, ॲड. आनंद मोरे,  निवृत्ती ढोबळे,  मारुती विश्वासराव आदी मान्यवरांच्या  हस्ते शाल,  पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला,  याप्रसंगी मिलेनियम टॉवर्स हाउसिंग सोसायटीचे  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पण्या