नांदेड:( दि.६ ऑगस्ट २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग हा मराठवाड्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक नावाजलेला विभाग असून या विभागातील अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महाविद्यालयात प्राध्यापक,प्राचार्य आदी पदावर कार्यरत आहेत तसेच अनेक विद्यार्थी आय.आय.टी., आय.आय.सी.टी., एन.आय.टी., आय.आय.एस.इ.आर., एन.आय.एस.इ.आर. सारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत.
आजपर्यंत या विभागातून २५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सेट, नेट, गेट तसेच अनेक स्पर्धात्मक परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केलेले आहे तसेच या विभागात आत्तापर्यंत दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च विद्यावाचस्पती ( पीएच.डी.) ही पदवी सुद्धा प्राप्त केलेली आहे.
याही वर्षी ही यशस्वी परंपरा कायम राहिली असून यावर्षी रसायनशास्त्र विभागातील ६ विद्यार्थी डॉ.मदन आंभोरे, कु.शाहमीन जुबैया, श्री.साईप्रसाद संत्रे, स्वानंद देशमुख,संकेत कोनेरी हे विद्यार्थी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक पात्रता चाचणी परीक्षा (सेट) उत्तीर्ण झालेले आहेत.
या देदीप्यमान सुयशाबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे विद्यमान खासदार व संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते उपरोक्त विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.एम.ए.बसीर, डॉ.संभाजी वर्ताळे, डॉ.सुभाष जुन्ने, डॉ.विजय भोसले, डॉ.शिवराज शिरसाट, डॉ.संदीप खानसोळे, डॉ.कविता केंद्रे, डॉ.निलेश चव्हाण, डॉ.दत्ता कवळे, प्रा.संतोष राऊत,डॉ.अनिल कुंवर, प्रा. शांतुलाल मावसकर, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही. पदमाराणी राव, जगन्नाथ महामुने, जगदीश उमरीकर, परशुराम जाधव, ओम आळणे, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनीही अभिनंदन केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा