*इतिहासाचा अभ्यास मानवी प्रगतीसाठी उपकारक* -डॉ.बालाजी चिरडे


नांदेड: (दि.४ ऑगस्ट २०२४)

          रानटी अवस्थेतील माणूस आज प्रगत अवस्थेमध्ये पोहोचलेला आहे. हे जाणून घेण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासाची गरज असते. अर्थात मानवाची प्रगती इतिहासाच्या अभ्यासातूनच कळते, असे उद्गार महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथील इतिहास विभागप्रमुख सुप्रसिद्ध लेखक व विचारवंत डॉ.बालाजी चिरडे  यांनी केले. 

          श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार इतिहास विभागात आयोजित सत्रारंभ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

            पुढे बोलताना डॉ.बालाजी चिरडे म्हणाले की, इतिहास हा भूतकाळातील घटना उलगडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आला आहे.

          कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी भूषविले. अध्यक्षीय समारोपात डॉ.कविता सोनकांबळे यांनी, विद्यार्थी इतिहासाचा अभ्यास करून स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवू शकतो. खरं तर इतिहास हा रोजगाराभिमुख शिक्षण देणारा विषय असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले. 

          प्रारंभी प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख डॉ.शिवराज बोकडे यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय डॉ.संगीता शिंदे (ढेंगळे) यांनी करून दिला.

            सूत्रसंचालन कु. मधू कदम यांनी केले तर आभार प्रा.राजश्री भोपाळे यांनी मानले.

          कार्यक्रमास डॉ.साईनाथ बिंदगे, डॉ. विश्वाधार देशमुख, डॉ. साईनाथ शाहू यासोबतच प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव,  प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, जगन्नाथ महामुने, विठ्ठल सुरनर, नाना शिंदे आदींनी सहकार्य केले.

टिप्पण्या