*'यशवंत ' मध्ये 'संगीत कलेचा विकास व व्यवसायाच्या संधी' या विषयावरील व्याख्यान संपन्न*

 

नादेड:(दि.३० जुलै २०२४)

           श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील संगीत विभागामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शारदा संगीत विद्यालय, नांदेड येथील संचालक डॉ.प्रमोद देशपांडे यांचे 'संगीत कलेचा विकास व व्यवसायाच्या संधी' या विषयावर इंडक्शन प्रोग्राम अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 

           डॉ.प्रमोद देशपांडे यांनी, संगीत कला उपजीविकेचे प्रभावी साधन आहे तसेच संगीत क्षेत्रामुळे अनेकांना उपजीविका आणि रोजगार उपलब्ध होण्याची फार मोठी संधी आहे, असे मनोगत व्यक्त केले.

          या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ.एच.एस.पतंगे यांनी भूषविले.

          प्रारंभी प्रास्ताविकात संगीत विभागप्रमुख डॉ.एस.व्ही.शिंदे यांनी, मागील वर्षी झालेल्या विविध स्पर्धा व स्पर्धेत विद्यार्थ्यांद्वारे प्राप्त पारितोषक, स्टुडंट प्रोग्रेशन, संगीत विभागातील उपलब्ध सुविधा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये संगीत विषयाचे स्थान आदी सविस्तर माहिती दिली.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्या  नरवाडे यांनी केले तसेच आभार प्रा.  संगीता चाटी यांनी मानले.

          संगीत विभागातील बी.ए.द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी भजन, गवळण, नाट्यगीत, गझल, भावगीत आदींचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

        विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामध्ये प्रदीप नरवाडे, विश्वनाथ माटाळकर, उदय जाधव, मंगेश भालेराव, माधवी मठपती, दुर्गा जगदंबे, माधवी शिळेकर आदींनी सहभाग घेतला. 

          यावेळी बी.ए. प्रथम वर्षाचे संगीत, स्किल संगीत, जेनेरिक इलेक्टिव्ह संगीत  तसेच बी.ए. द्वितीय व तृतीय वर्षाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल. व्ही. पदमाराणी राव, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, डी.एस. ठाकूर, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या