हिमायतनगर तालुक्यातील अंत्योदय लाभधारकाच्या साखर वाटपात हेराफेरी; शेकडो कोरी पॉकेट कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर..

 

अंत्योदय लाभार्थ्यांच्या नावाने आलेले साखरेचे पॉकेट फोडून दुकानदाराकडून काळया बाजारात विक्री साखरेपासून वंचित लाभार्थ्यांकडून चौकशीची मागणी  
हिमायतनगर| शासनाकडून अंत्योदय लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या साखरेचे वाटप एप्रील महीन्यात केल्या गेले नसल्याच्या असंख्य तक्रारी वाढू लागल्या आहेत. दरम्यान हिमायतनगर शहराजवळील पाणी पुरवठा टाकी जवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर शेकडो साखरेचे पॉकेट फोडून रिकामी पॉकिटे फेकून दिल्याचा प्रकार आता समोर आला आहे. यावरून अंत्योदय लाभार्थींच्या साखर वाटपात मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचा संशय बळावला आहे. साखरेचे पॉकेट कोणत्या दुकानदाराने त्यातील साखर काढून घेऊन फेकून दिले याची चौकशी करून त्याचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी साखरेपासून वंचित लाभार्थ्यांकडून केली जात आहे.  
शासनामार्फत अंत्योदय लाभार्थ्यांना माहेवारी साखर उपलब्ध करून दिली जाते. मात्र हिमायतनगर तालुक्यातील अंत्योदय लाभार्थ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून साखरेचे नियमित वितरण होत नाही अशी ओरड होऊ लागली आहे. शासनाकडून एप्रिल महिन्यात साखर वाटपाला मान्यता देण्यात आली होती आणि साखरेचे नियतीनं देखील वितरणासाठी पाठविण्यात आले होते. परंतु  एप्रिल महिन्यात बहुतांश दुकानदारांनी लाभार्थ्यांना साखर वितरित केली नसल्याची मोठ्या प्रमाणात ओरड होत आहे. धान्य नियमित दिले जात असताना मात्र साखर का..? दिली जात नाही, असा प्रश्न लाभार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे.
अंत्योदय लाभार्थी वगळता इतर कार्डधारकांना साखर उपलब्ध होत नाही. ग्रामीण भागातील अनेक दुकानदार साखर मिळाली नसल्याचे सांगून लाभार्थ्यांची फसवणूक करतात असे बोलल्या जाते. त्यामुळे अनेक लाभार्थी साखरेच्या लाभापासून वंचित आहेत. संबंधित लाभार्थ्याला मिळालेल्या मालाची दुकानदाराने दिलेल्या पावतीमध्ये नोंद केली जाते. यासाठी लाभार्थ्यांनी दुकानदाराकडून दिली जाणारी पावती तपासायला हवी पावतीमध्ये साखरेचा उल्लेख असल्यास, स्वस्त धान्य दुकान मालकाने ती मुद्दाम दिली नाही असे उघडपने बोलल्या जात आहे. दरम्यान हिमायतनगर शहरात शेकडो रिकामे पॉकेट हिमायतनगर शहराजवळील पाण्याच्या टाकी जवळील थेट कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर टाकून देण्यात आल्याने हिमायतनगर तालुक्यात अंत्योदय लाभार्थ्यांच्या नावाने आलेले साखरेचे पॉकेट फोडून दुकानदाराने याची काळया बाजारात विक्री तर केली असल्याची शंका आता लाभधारकांकडून उपस्थित केली जात आहे. 
या गंभीर बाबीची जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी गंगाभीर्याने नोंद घेऊन हिमायतनगर पुरवठा विभागाला एप्रिल महिन्यात पाठविण्यात आलेल्या साखरेच्या नियतन मालाची आणि वितरण केलेल्या साखरेच्या पॉकिटची तपासणी करून यात दोषी असलेल्या अधिकारी व दुकानदारावर कार्यवाहीचा बडगा उगारावा अशी मागणी लाभार्थ्यामधून केली जात आहे. 
टिप्पण्या