नवी मुंबई: नवी मुंबई येथील सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महिन्याच्या शेवटी नेहमीप्रमाणे ३० नोव्हेंबर २०२५ रोजी ५१ ज्येष्ठ नागरिक सभासदांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरा करणारा आनंद मेळावा पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
आनंद मेळावा प्रसंगी यापुढे संघाची धुरा सांभाळणारे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव, सचिव जगदीश एकावडे, खजिनदार महादेव पाटील व इतर पदाधिकारी, त्याचप्रमाणे संघ कार्यासाठी योगदान देणारे संघाचे माजी अध्यक्ष मारुती कदम, सचिव शरद पाटील, खजिनदार विष्णुदास मुखेकर व इतर पदाधिकारी, निवडणूक अधिकारी रमेश मोहिते, शांताराम जावळे, रामचंद्र पाठक, प्रसार माध्यमातील राष्ट्रीय स्तरावरच्या रापा पुरस्कार विजेत्या आणि आंतरराष्ट्रीय न्यूज स्टोरी टुडे पोर्टलच्या निर्मात्या सौ. अलका भुजबळ, संघाचे फलक सुंदर अक्षराने लिहिणारे नारायण साखरे तसेच ५१ वाढदिवस असणाऱ्या सभासदांना माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, कोमल वास्कर, समाजसेवक अविनाश जाधव, प्रियंका जाधव यांच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उत्तम चव्हाण या ज्येष्ठ नागरिकाच्या अपघात प्रसंगी मदत करणाऱ्या सौ अश्विनी संदेश मोरे यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक भाषण संघाचे सचिव जगदीश एकावडे आणि शरद पाटील यांनी केले. ज्येष्ठ नागरिक संघात झालेल्या कार्याची त्याचप्रमाणे भविष्यात होणाऱ्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव माजी अध्यक्ष मारुती कदम, विष्णुदास मुखेकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात दिली. याप्रसंगी सोमनाथ वास्कर, कोमल वास्कर, अविनाश जाधव, प्रियांका जाधव, विकास गाढवे यांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने वाढदिवसाच्या मानकरी असणाऱ्यांचे निवेदन संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे यांनी केले देणगीदारांची नावे संघाचे खजिनदार महादेव पाटील यांनी वाचली, तर आभार संघाच्या उपाध्यक्षा सौ. सीमा बोराडे यांनी मानले. ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते पत्की आणि इतर सभासदांनी वाढदिवसाचे सामूहिक गाणे गाईले. शेवटी ज्येष्ठ नागरिकांना स्नॅक्स वाटप करून आनंद मेळाव्याची सांगता झाली.

addComments
टिप्पणी पोस्ट करा