पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील मंचर या गावचे कै. प्रभाकर दशरथ गांजाळे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त घोडेगाव जवळील पळसटीका येथील सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठान, संचलित बालगृह अनाथ आश्रम येथे पुष्पा प्रभाकर गांजाळे परिवारातर्फे स्नॅक्स वाटप करण्यात आले.
पळसटीका येथे ६० अनाथ निराधार मुलांचे संगोपन होते. घोडेगाव जवळ पळसटिका म्हणून एक छोटेसे गाव आहे. भीमाशंकरच्या कुशीत निसर्गरम्य ठिकाणी हे अनाथ आश्रम असून येथे मुलांचे संगोपन फार चांगल्या पद्धतीने होत आहे .
श्रीमती पुष्पा प्रभाकर गांजाळे व त्यांची मुले अक्षय प्रभाकर गांजाळे व अभय प्रभाकर गांजाळे या परिवारातर्फे कै. प्रभाकर दशरथ गांजाळे यांचा दरवर्षी गुरुपौर्णिमेचे व पुण्यस्मरणाचे औचित्य साधून हे कुटुंब दरवर्षी या अनाथाश्रमाला भेट देऊन स्नॅक्स वाटप करीत असते.
येथील निराधार मुलांना आधार देण्याचे काम गुरुपौर्णिमेला हे कुटुंब दरवर्षी करीत असते.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा