*घरांच्या प्रश्नावर गिरणी कामगार संघटनांची ११ रोजी ३वाजता सभा


    *मुंबई दि.७:गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर‌ देण्यात आलेल्या आश्वासनांची शासनाने अद्याप पूर्तता न केल्यामुळे कामगारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रश्नावर येत्या शनिवार दि‌.११ रोजी दुपारी ३ वाजता,परेलच्या महात्मा गांधीसभागृहा त,गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने कामगारांची सभा आयोजित करण्यात आली आहे !* 

     आज घरांची मागणी अधिक‌ परंतु जागेची उपलब्धता मात्र कमी‌ आहे, तेव्हा या प्रश्नावर नव्याने बांधण्यात येणा-या बी.डी.डी‌.चाळीतील घरे,धारावी पुनर्वसनातील घरे,मिठागरांची जागा गिरणी कामगारांना घरांसाठी द्यावी, सिडको मधील‌‌ किवा ट्रॅंझिस्ट कॅम्प मधील घरे गिरणी कामगारांना देण्यात यावी,ज्या एनटीसी गिरण्या सरकार चालविणार नाही,त्या गिरण्यातील जागा गिरणी कामगारांना घरांसाठी द्यावी, बोरिवली खटाव येथील पडून असलेली ४५ एकर जागा घर बांधणी साठी देण्यात यावी,या संघटनेच्या वतीने सरकारकडे‌ मागण्या करण्यात आल्या होत्या,परंतु सरकारने नरो‌ वा कुंजोरोची भूमिका घेतली आहे,त्या संदर्भात सभेत जाब विचारण्यात येईल.सभेत कोन गावातील घरांच्या देखभाल खर्चा बाबत घेतलेल्या निर्णयांची अंमलब जावणी करावी, गिरण्यांच्या चाळींचा रखडलेला पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावावा,आदी मागण्या करण्यात येणार आहेत.

    या  प्रश्नावर संघटनांच्या समन्वयक जयश्री खाडिलकर पांडे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते,महाराष्ट्र गिरणी संघटनेचे सरचिटणीस जयप्रकाश भिलारे,सेंच्युरी मिल कामगार एकता मंचचे अध्यक्ष नंदू पारकर ,सर्वश्री निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, शिवाजी काळे,जितेंद्र राणे ,बबन गावडे,आदी कामगार नेत्यांची भाषणे होतील.सभेत पुढील आंदोलन ठरविण्यात येईल. गिरणी कामगारांनी लढ्याच्या मागे एकजूट उभी केली तर मुंबईत घरे मिळणे कठीण नाही, तरी कामगारांनी मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहावे,असे आवाहन संघटना नेत्यांच्या वतीने करण्यात आले आहे.•••••

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज