यशवंत ' मधील एनसीसी कॅडेट्सची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड

 नांदेड:( दि.१७ जानेवारी २०२६)   श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट्स जे.यु.ओ. शंकर वहिंदे व अभिनव कदम यांची तामिळनाडू येथे दि.१९ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान संपन्न होणाऱ्या ' एक भारत श्रेष्ठ भारत' या राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी दोन्ही कॅडेटसचा यथोचित सत्कार केला आणि राष्ट्रीय शिबिरासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.    या दोन्ही कॅडेट्सना ५२ महाराष्ट्र बटालियनच्या वतीने सगरोळी येथील एनसीसी थर्ड ऑफिसर मंगेश कुलकर्णी सहकार्य करणार आहेत. संपूर्ण देशभरातून सहभागी होणाऱ्या कॅडेट्सना राष्ट्रीय एकात्मता, कल्चर एक्सचेंज प्रोग्रॅम इ. संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.राष्ट्रीय स्तरावरील या निवडीबद्दल उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ. एल व्ही पदमाराणी राव, डॉ.साहेब शिंदे, प्रा. माधव दुधाटे, लेफ्टनंट डॉ.रामराज गावंडे, राष्ट्रीय छात्र सेनेचे संचालक लेफ्टनंट प्रा. श्रीकांत सोमठाणकर, डॉ.अजय गव्हाणे, प्रा. ओमप्रकाश गुंजकर, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आदींनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या