परभणी (. ) महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन घ्या मान्यतेने व परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस असोसिएशन वतीने कै. रमेश पारे यांच्या स्मरणार्थ मराठवाडा विभागीय क्रीडा स्पर्धा दि. १ मे रोजी श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे उद्घाटनप्रसंगी बोलताना यतिन टिपणीस म्हणाले कै. रमेश पारे हे कुशल नेतृत्व,संघटक होते त्यांनी संपूर्ण मराठवाड्यात टेबल टेनिस खेळांचा प्रसार व प्रचार केला आज जो टेबल टेनिस खेळ पाहतोय तो केवळ रमेश पारे यांच्या मुळे, परभणी जिल्ह्यातील खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळतात .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे म्हणाले की जिल्हा संघटना वतीने आयोजित क्रीडा स्पर्धा मुळे नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त ठरते,
याप्रसंगी राज्य सरचिटणीस यतिन टिपणीस प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, महेश कांकरिया, चेतन डेकाटे, जिल्हा सचिव गणेश माळवे, आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, येथील १५० खेळाडूंचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश माळवे यांनी केले तर सुञसंचलन सृष्टी रावणगांवकर ,आभार प्रदर्शन चेतन मुक्तावार यांनी मानले.
पंच प्रमुख गौरव फन्साळकर,
स्पर्धा यशस्वीतेसाठी डॉ. अजिंक्य धन, श्रीकांत दुधारे, निखिल झुटे, विजय अवचार, रोहित जोशी, धीरज देशमुख, नृसिंह चाटे,सुरज भुजबळ, स्वप्निल आरसुळ

addComments
टिप्पणी पोस्ट करा