बंधुत्व फाउंडेशनतर्फे सुरक्षा रक्षक सागर जाधव यांचा प्रामाणिकपणाबद्दल सत्कार*

१ मे या महाराष्ट्र दिन व कामगार दिनचे औचित्य साधून बंधुत्व फाऊंडेशनतर्फे वडाळा  येथील मुंबई पोर्ट ॲथॉरिटीच्या हाॅस्पिटलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर  महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान सागर जाधव यांचा फेटा व शाल घालून  सत्कार करण्यात आला. 

 १५ एप्रिलला वडाळा येथील सर्जिकल ओपीडी जवळ एक बॅग मिळाली. त्यात १२ हजार रुपये  व इतर सामान होते. तसेच १६ एप्रिलला गेट नंबर १ जवळ बॅग मिळाली. त्यात ७७०/- रुपये होते. या दोनही बॅगा त्याच्या मालकाला शोधून परत करण्यात आली. सागर जाधव यांच्या  प्रामाणिक पणाची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बंधुत्व फाउंडेशनचे अध्यक्ष  समीर राणे, सुरेश मुरुडकर, प्रदीप खोत, शरद पठाडे, महाराष्ट्र सुरक्षा बोर्डाचे  विजय कानवडे, अक्षय सुर्वे, करण सिंग गिरासे, सुप्रिया शिंदे व हाॅस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.

आपला 

 मारुती विश्वासराव 

प्रसिद्धी प्रमुख

 मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज